situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025 : चुलत्याकडून पुतण्यावर जीवघेणा हल्ला

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025

Team My Pune City – कौटुंबिक वादातून चुलत्याने ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)आपल्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी निगडी येथील ग्लोबल अँड गुरुदत्त पे अँड पार्किंग समोर घडली.

या प्रकरणी महेश ज्ञानोबा काळभोर (३५, समर्थ नगर, निगडी, पुणे) यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तुकाराम सखाराम काळभोर (६०, समर्थ नगर, निगडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम हे फिर्यादीचे चुलते आहेत. त्यांनी फिर्यादीच्या कर्मचाऱ्यास पार्किंगसमोर गाड्या पार्क करू नये म्हणून शिवीगाळ केली. फिर्यादीचा भाऊ जाब विचारण्यासाठी गेला, या कारणावरून आणि जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने लोखंडी फावड्याने फिर्यादीच्या भावाच्या डाव्या भुवईवर मारून गंभीर दुखापत केली. तसेच, “तुम्हा सर्वांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन तो निघून गेला. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.


गणपती वर्गणीच्या नावाखाली खंडणी ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)

काळेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका लॉजिंगच्या व्यवस्थापकाला गणपती वर्गणीच्या नावाखाली पैशांची मागणी करून धमकी देण्यात आली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी पिंपळे सौदागर येथील साईदीप लॉजिंगमध्ये घडली.

 अखिलेश कुमार महावीर गौतम (२५, साईदीप लॉजिंग, पिंपळे सौदागर) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन, अजय आणि एक अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडे गणपती वर्गणी म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी फिर्यादीला १२०० रुपयांची पावती देऊन फोन पे क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले. जर पैसे दिले नाहीत, तर “बघून घेऊ” अशी धमकी दिली आणि उद्या पुन्हा याच वेळी येण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून १२०० रुपये रोख खंडणी म्हणून घेतले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Pune Fire News : गुरुवार पेठेतील सोसायटीत पहाटे भीषण आग; अग्निशमन जवानांनी 46 रहिवाशांना काढले सुखरूप बाहेर


रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे बाळगल्यामुळे स्वतःवरच गोळीबार ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)

परवानाधारक रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे बाळगल्यामुळे एका व्यक्तीच्या स्वतःच्या पायात गोळी लागली. ही घटना २७ ऑगस्ट रोजी कुरळी गावात घडली.

 पोलीस हवालदार सदाशिव नाईकनवरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर गुलाब सोनवणे (३५, सोनवणे वस्ती, कुरळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुरने त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हर बाळगताना परवान्याच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही. या निष्काळजीपणामुळे रिव्हॉल्व्हरमधून राऊंड फायर होऊन त्याच्या स्वतःच्या डाव्या पायात गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


अपघातात मुलाचा मृत्यू, मित्राला गंभीर दुखापत ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)

भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (१ सप्टेंबर) रात्री एमआयडीसी भोसरी येथे इंद्रायणी नगर रस्त्यावर इफिशिएंट इंजिनिअर्स कंपनीसमोर घडली.

या प्रकरणात विकासकुमार संजय सेठ (३४, विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक लेलँड टेम्पो (एमएस १४/एलएक्स १६६२) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा मोहित विकासकुमार सेठ आणि त्याचा मित्र प्रियांशु अरुण शर्मा हे दुचाकीवरून इंद्रायणी नगर रस्त्यावरून जात असताना, समोरून आलेल्या भरधाव टेम्पोचालकाने वाहतुकीचे नियम धुडकावून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र प्रियांशु शर्मा गंभीर जखमी झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Lonavala Crime News : लोणावळा शहरात अल्पवयीन मुलावर 18 वर्षीय तरुणाकडून बलात्कार


कंपनीतील सांडपाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)

महाळुंगे इंगळे येथील कंपन्यांमधून सोडलेल्या दूषित सांडपाण्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी ४:३० वाजता एच. पी. चौकातील हॉटेल कोर्टयार्डच्या मागील मोकळ्या जागेत घडली.

या प्रकरणात बाळू दामु कोकरे (४०, एच. पी. चौक, महाळुंगे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हॉटेल कोर्टयार्डच्या मागे असलेल्या कंपन्यांच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी मेंढ्या चारत असताना, कंपन्यांमधून नाल्यात सोडलेले दूषित सांडपाणी १८ मेंढ्यांनी प्यायले. त्यामुळे त्यांच्या नाका-तोंडातून फेस आणि पाणी येऊन त्यांचा मृत्यू झाला. कंपनी प्रशासनाला याची जाणीव असतानाही त्यांनी हे दूषित पाणी बाहेर सोडले, ज्यामुळे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, असे फिर्यादीने म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी ५:१० वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी येथील शनी मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात करण्यात आली.

प्रभू विनोद भोसले (२७, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार आशिष बनकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू हा ३० हजार रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १००० रुपयांची दोन जिवंत काडतुसे कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे जवळ बाळगताना आढळला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


जुगार खेळणाऱ्या ६ जणांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 03 September 2025)

 पैशांवर जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (१ सप्टेंबर) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास चिखली येथील रामदासनगर गल्ली नंबर १ मध्ये नवनाथ डिंबर यांच्या खोलीत करण्यात आली.

प्रतीक हनुमंत थिटे (३४, चिखली), सतीश उत्तम ढेबरे (४१, चिखली), आशिष संजय मुंढे (३०, चिखली), संतोष राजाराम साने (४५, चिखली), सचिन मधुकर शेलार (४०, चिखली), आणि राजेश चंद्रकांत साने (४१, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस नाईक सुरज सुतार यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीरपणे पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून २ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On