Team MyPuneCity – गांजा विक्री प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (२ जून) सकाळी आळंदी येथे करण्यात (Pimpri-Chinchwad Crime News 03 June 2025) आली.
आकाश मांगीलाल राठोड (२८, कात्रज) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विपुल होले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आकाश राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ हजार ८५० रुपये किमतीचा १९७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू (Pimpri-Chinchwad Crime News 03 June 2025)
शिक्रापूर-चाकण रोडवर शेलपिंपळगाव येथे टेम्पोने एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (२ जून) सायंकाळी घडला.
विमल मोहिते (शेलपिंपळगाव, खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी निखिल शंकर मोहिते (३४) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच १६/सीसी ०६९५) चालक सलीम चिनीभूत मलिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल यांची आजी विमल शिक्रापूर-चाकण रोडने विरुद्ध दिशेने चालत जात होत्या. शेलपिंपळगाव येथे शिक्रापूर कडून चाकणच्या दिशेने आलेल्या टेम्पोने विमल यांना धडक दिली. विमल टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार
किरकोळ वादातून चौघांनी एका तरुणाच्या घरात जाऊन घरातील वस्तूंची तोडफोड करत तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (१ जून) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली.
सागर संजय टोंगळे (२४, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन गायकवाड (१९, थेरगाव) आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि त्यांची आई घरात असताना आरोपी घरात जबरदस्तीने आले. त्यांनी घरातील लॅपटॉप आणि टीव्ही कोयत्याने फोडला. सागर यांना शिवीगाळ केली. आरोपींना अडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी सागर यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले.
मॅनेजर असल्याचे भासवून नऊ लाख घेतले (Pimpri-Chinchwad Crime News 03 June 2025)
कंपनीचा मॅनेजर असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तींनी कंपनीच्या अकाउंटंटकडून नऊ लाख रुपये एका बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी मोरवाडी पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ववैमनस्यातून दोघांना बेदम मारहाण (Pimpri-Chinchwad Crime News 03 June 2025)
जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (१ जून) रात्री निगडी येथे घडली.
संजय इंद्रजित धेंडे (४५, निगडी), जमील पठाण अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. संजय यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय धेंडे, भैय्या उर्फ बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड, राहुल साळुंखे, अज्जू महाकाली, आसिफ शेख आणि इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांचा मित्र जमील पठाण हे अजंठानगर निगडी येथे कामानिमित्त गेले होते. तिथे असलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून जमील यांना पाईप, पेविंग ब्लॉक, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी संजय धेंडे गेले असता आरोपींनी त्यांनाही सिमेंट ब्लॉकने मारहाण करून दुखापत केली. पोलिसांनी विजय धेंडे, बाबासाहेब गजरमल, राहुल साळुंखे, दत्ता गायकवाड आणि आसिफ शेख यांना अटक केली आहे.