situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 03 July 2025 : पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 03 July 2025

Team My pune city – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. दारू पिऊन पतीने पत्नीसोबत सतत भांडण ( Pimpri Chinchwad Crime News 03 July 2025) केले. या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (1 जुलै) सकाळी अकरा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली.

रिंकू मल्हारी भोसले (22, मोहननगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रिंकू यांचे वडील राजेंद्र धोंडीराम पौळ (50, धाराशिव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिंकू यांचा पती मल्हारी संपत भोसले (22) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्हारी याने लग्नानंतर पाच महिन्यांपासून पत्नी रिंकू यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा छळ केला. दारूच्या नशेत त्यांना सतत मारहाण करत माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. रिंकू यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. सतत भांडण करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून रिंकू यांनी राहत्या घरी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Baner : बाणेर येथे गाडीवर झाड पडले, कोणीही जखमी नाही


वाहनांची तोडफोड; तिघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 03 July 2025)

क्षुल्लक भांडणातून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याची आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (1 जुलै) रात्री बोपोडी ब्रिजजवळील इनामदार पोल्ट्री फार्मसमोर घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

साकिब रफिक शेख (32, लोहगाव), रवी मसलिंगाप्पा लकाबशेट्टी (24, विश्रांतवाडी), मोहसीन हनीप शेख (20, येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोईउद्दीन उर्फ मुन्ना रफिक शेख (29, दापोडी) यांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईउद्दीन हे त्यांचे मित्र रेहान शेख, सैफ आणि नईम उर्फ भुऱ्या यांच्यासह एका रिक्षात बसले होते. त्यावेळी आरोपी साकिब शेख हा त्याचे साथीदार रवी आणि मोहसीन यांच्यासह तिथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी साकिबने फिर्यादी मुन्ना यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने शिवीगाळ करत मोठमोठ्याने आरडाओरडा करून मुन्ना यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कोयत्याने मुन्ना यांच्यावर वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडविण्यासाठी येणाऱ्या लोकांना देखील मारण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी परिसरातून वाहनांची तोडफोड करून कार मधून पळ काढला.

Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर


कंपनीतील अधिकाऱ्यांना मागितली 11 लाखांची खंडणी ( Pimpri Chinchwad Crime News 03 July 2025)

महाळुंगे एमआयडीसी मधील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना 11 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (1 जुलै) सायंकाळी घडली असून याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा जाधव (30, खराबवाडी, खेड), अमितकुमार पटेल (28), बलराम पटेल (35, कुरुळी, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमित अनंतराव वरुटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित हे महाळुंगे एमआयडीसी मधील सिद्धकला इंडस्ट्रीज या कंपनीत काम करतात. आरोपी मंगळवारी सायंकाळी त्यांच्या कंपनीत आले. त्यांनी फिर्यादी अमित आणि त्यांचे ऑपरेशन मॅनेजर राहुल साठे यांना 11 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम कंपनीचा पूर्वीचा कंत्राटदार राहुल कंधारकर याला देण्यास आरोपींनी संगितले. खंडणी न दिल्यास बघून घेण्याची आरोपींनी धमकी दिली.


किरकोळ कारणावरून कोयत्याने वार ( Pimpri Chinchwad Crime News 03 July 2025)

दापोडी मध्ये शीतलामाता चौकात एका व्यक्तीचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये व्यक्ती गंभीर झाला असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (1 जुलै) दुपारी घडली.

मोहम्मद इरफान शेख (36, दापोडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर श्याम गायकवाड (20, दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरी असताना आरोपी शेख यांच्या घरी आला. त्याने शेख यांना आयफोन देण्याची मागणी केली. मात्र आपण आयफोन आपल्या घर मालकाला दिला असल्याचे शेख यांनी सांगितले. त्या कारणावरून आरोपीने शेख यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. आरोपीला घाबरून शेख यांनी घरातून पळ काढला. शेख यांचा पाठलाग करून आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

Follow Us On