Team My Pune City – एका तरुणाने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आणि ( Pimpri Chinchwad Crime News 01 September 2025) अफेअर असल्याचा आरोप केल्यामुळे एका तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) सकाळी वाकी बुद्रुक येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रज्वल विश्वास राळे (१९, राक्षेवाडी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रज्वल आणि मयत तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपीने लग्नाला नकार दिला आणि तिच्यावर दुसऱ्या मुलासोबत अफेअर असल्याचा आरोप केला. त्यामुळे नैराश्यातून मयत तरुणीने शेतातील पिकांवर मारण्यासाठी आणलेले ‘विडॉफ’ नावाचे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करत आहेत.
पूर्ववैमानस्यातून मारहाण करून लुटले ( Pimpri Chinchwad Crime News 01 September 2025)
जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका व्यक्तीला सिमेंटच्या विटेने, लाथाबुक्क्यांनी आणि चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री जय गणेश व्हिजन इमारतीसमोर, आकुर्डी येथे घडली.
या प्रकरणी शंकर हनुमंता हेळावारु (२४, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकबर इराणी (चिंचवड स्टेशन), संतोष भिसे (चिंचवड) आणि आदित्य शिंदे (चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी संगनमत करून शंकर यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी सिमेंटच्या विटेने, चामड्याच्या पट्ट्याने तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. शंकर यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूला दुखापत केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 01 September 2025)
मुंबई-बंगळूर महामार्गावर, मामुर्डी देहुरोड येथे एका हायवा ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) सकाळी साई द्वारका सोसायटीसमोरील सर्व्हिस रोडवर घडली.
या प्रकरणी धरेंद्र लोकशाही (३०, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीप महाविर यादव (२२, ताथवडे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. दीकपाल बहादुर शास्त्री (३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा ट्रक बॅरिकेड्स लावून बाह्यवळण काढलेल्या सर्व्हिस रोडवर भरधाव वेगाने चालवला. दीकपाल यांच्या दुचाकीला हायवाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दीकपाल यांचा मृत्यू झाला. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 01 September 2025)
बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याबाबत एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी निघोजे रोडवरील हॉटेल शेतकरी येथे करण्यात आली.
वेदांत उर्फ मोन्या विठ्ठल गवारे (१९, मोई गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वेदांत याने ५२ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे कोणत्याही परवानगीशिवाय स्वतःजवळ बाळगले होते. तो पिस्तूल घेऊन निघोजे रोडवरील हॉटेल शेतकरी येथे आला आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून वेदांत याला अटक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Crime News : पूर्ववैमनस्यातून गाडीवर दगडफेक करून नुकसान
पिरंगुट घाटात अपघात, एकाचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 01 September 2025)
पौड रोडवरील पिरंगुट घाटात एका टेम्पो चालकाने निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवून दोन गाड्यांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून, चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी घडली.
साजनकुमार पुरषोत्तम (२२, आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नवनाथ किसन शिंदे (४४, कासारअंबोली) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो (एमएच १२/पीक्यू १२१५) वरील अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या गाडीने कोथरूडला जात असताना आरोपीने त्याचे वाहन बेदरकारपणे चालवून त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली. त्यानंतर त्याने पाठीमागील इरटिका गाडीलाही धडक दिली, ज्यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. आरोपीने टेम्पो भरधाव वेगात चालवल्याने तो उलटला, यात साजनकुमार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी चालक जखमी व्यक्तीला रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळून गेला. बावधन पोलीस तपास करत आहेत.