Team MyPuneCity – मोशीतील गोकुळधाम सोसायटीमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपये किमतीचे सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. (Pimpri-Chinchwad Crime 26 May 2025) ही घटना २३ मेच्या रात्री ते २४ मेच्या दुपारपर्यंतच्या कालावधीत घडली.
या प्रकरणी विजय बळवंत बर्गे (३८) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळधाम सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे शशि भूषण पांडे यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटातून दोन लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
Dehuroad Accident : एसटी बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पाईप चोरल्याचे सांगितल्याने एकास मारहाण (Pimpri-Chinchwad Crime 26 May 2025)
गोडाऊन मधून लोखंडी पाईप चोरल्याचे सांगितल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले. ही घटना शनिवारी (२४ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरीतील बौद्धनगर येथे घडली.
याप्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किश हजारे (१९, बौद्धनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हजारे याने फिर्यादी यांच्या चुलत्यांच्या गोडाऊन मधून लोखंडी पाईप चोरी केले. चोरी करत असताना फिर्यादी यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या चुलत्यांना गोडाऊन मधून पाईप चोरल्याचे सांगितले. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
भरधाव रिक्षाची स्कूटीला धडक; दोघे जखमी (Pimpri-Chinchwad Crime 26 May 2025)
पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावाजवळ कल्याणी कंपनी समोर भरधाव रिक्षाने स्कूटीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात स्कूटीवर असलेले पती-पत्नी जखमी झाले. ही घटना रविवारी (२५ मे) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच १४/एसके २३४८) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गाने जात होते. कुरुळी येथे आल्यानंतर त्यांना रिक्षाने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून डोळ्याजवळ मार लागला आहे. तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत.