Team My pune city –पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील ८८ इमारती व घरे धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी मालकांना नोटिसा बजाविल्या. त्यापैकी १३ घर मालकांनी स्वतःहून इमारतीची दुरुस्ती करून घेतली आहे. एक अतिधोकादायक इमारत महापालिकेने पाडली आहे, तर ७४ लोकांनी महापालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले आहे.
पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेकडून जुन्या इमारती, वाडे, घरे यांचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती निश्चित केल्या जातात. यंदा शहरात एकूण ८८ धोकादायक इमारती आढळून आल्या असून, त्यापैकी सहा अतिधोकादायक आहेत. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक ३७ धोकादायक इमारती आहेत. महापालिकेने ८८ इमारत मालकांना नोटिसा दिल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी धोकादायक बांधकामे हटवावी किंवा तातडीने दुरुस्ती करावी, असे आवाहन केले होते.
Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
मात्र, या नोटीसांकडे संबंधित इमारती मालकांनी दुर्लक्ष केले आहे. यामध्ये दोन अतिधोकादायक इमारती आहेत. आठ इमारतींतील रहिवाशांना तातडीने इमारत रिकामी करून दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तर, १४ इमारती रिकाम्या न करता दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेत आहेत. उर्वरित ५० इमारतींच्या मालकांना किरकोळ दुरुस्ती करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
Sanatan Sanstha : सनातन संस्थेच्यावतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर चिंचवड आणि तळेगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार !
नोटिस बजावलेल्या घर मालकांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा काही अपघात घडल्यास मालक जबाबदार राहतील असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.