situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad 27 June 2025: तोडफोड प्रकरणी दोघांना अटक

Published On:

Team MyPuneCity –वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरात काही तरुणांनी हातात कोयते, हातोडे व दगड घेऊन वाहनांची तोडफोड केली असून एकाने साडेसहा हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (२६ जून ) रोजी पहाटे २.३० ते २.४५ च्या सुमारास घडली.

गिरीष ऊर्फ मन्या शशीकांत लोंढे (१८, वाल्हेकरवाडी) आणि आदर्श बाबासाहेब चांदणे (१९, वाल्हेकरवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन ऊर्फ बाळु भिमराव लोखंडे (३२, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी वाल्‍हेकरवाडी येथील कॉलनीतील वाहनांची तोडफोड केली. यातील एका अल्पवयीन मुलाने लोखंडे यांच्या खिशातून रोख साडेसहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच लोखंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली.


टास्‍कच्‍या नावाखाली ४३ लाखांची फसवणूक

हिंजवडीतील एक महिला ऑनलाईन जॉब शोधत असताना तिच्‍याशी संपर्क करून तिला टास्‍क दिले. त्‍यासाठी तिला तब्‍बल ४३ लाख ३१ हजार रुपयांची गुंतवणूक करण्‍यास भाग पाडत तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना १२ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान घडली.

या प्रकरणी तीन महिलांसह विविध बँक खाते धारकांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय महिलेने गुरुवारी (२६ जून) हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

Pune : ‘हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’; ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस टेलिग्रामद्वारे कपिश गोल्ड ज्वेलरी कंपनीचा एजंट असल्याचे भासवले. महिलेला एक लिंक पाठवली. लिंकवर टास्क देऊन पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला काही परतावा देऊन विश्वास संपादन करत एकूण ४३ लाख ३१ हजार ३३६ रुपये ऑनलाईन स्वरूपात घेऊन ते पैसे परत न करता फसवणूक केली.


घरात घुसून पिता-पुत्रास मारहाण

एका शेतकऱ्याच्या घरात घुसून तीन जणांनी कोयत्याने मारहाण केली. ही घटना २५ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास खेड तालुक्‍यातील कोळीये या गावात घडली.

विशाल संतोष देशमुख, राहूल चव्हाण (दोघेही रा. कोळीये, ता. खेड, जि. पुणे) आणि त्‍यांचा एक साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. शंकर गंगाराम कावडे (३५, कोळीये, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, क्रिकेटचा बॉल लागल्याच्या जुन्या वादातून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत वडिलांना आणि फिर्यादी शंकर कावडे यांना कोयत्याने उलट्या बाजूने मारहाण केली.


ट्रेलर चालकाला लोखंडी रॉडने मारहाण

वडमुखवाडी येथील पांडुरंग एंटरप्रायजेस गॅरेज समोर पार्किंगमध्ये ट्रेलर घासल्याच्या कारणावरून चालकाला लोखंडी रॉड व बेल्टने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (२५ जून) मध्‍यरात्री घडली.

बाबू गोल्हार, निलेश महादेव गर्जे (२८, मोशी) व त्‍याचे तीन साथीदार यांच्‍या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर गहिनाथ वारे (३९, बीड) यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, वडमुखवाडी येथील पांडुरंग एंटरप्रायजेस गॅरेज समोर पार्किंगमध्ये ट्रेलर घासल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून ट्रेलर चालकाला लोखंडी रॉड व बेल्टने मारहाण केली. यामध्‍ये फिर्यादी ट्रेलर चालक जखमी झाले आहेत.


गुटखा विक्री प्रकरणी दोन कारवाया;१ लाख १२ हजारांचा गुटखा जप्त

किराणा दुकानात ४८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केल्‍याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली. तर एका फ्लॅटमध्ये ६४ हजार १३० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने हिंजवडी मधून एकाला अटक केली. याप्रकरणी गुरुवारी (२६ जून) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ललित कलारामजी देवासी (२४, खेड, मूळ रा. राजस्थान) याला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शरद खैरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने त्याच्या किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवणूक केला होता. माहितीवरून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कारवाई करत देवासी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४८ हजारांचा गुटखा जप्‍त केला आहे.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तालब बुरेखान खान (४२, साखरे वस्ती, हिंजवडी) याला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल समीर रासकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. साखरे वस्‍ती, हिंजवडी येथील एका फ्लॅटमध्ये आरोपी तालब खान याने प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून ६४ हजार १३० रुपये किंमतीचा गुटखा जप्‍त केला.


पिस्‍तुल बाळगल्‍याप्रकरणी एकास अटक

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२५ जून) सायंकाळी चौधरी पार्क जवळ, वाकड येथे करण्यात आली.

आफताब मेहबूब शेख (२४, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश गिरीगोसावी यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. वाकड मधील चौधरी पार्क जवळ एक तरुण बेकायदेशीरपणे पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आफताब याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.


सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

सावकारी त्रासामुळे एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. २५ ते २६ जून दरम्यान नाणेकरवाडी येथे ही घटना घडली.

संतोष हरिभाऊ नाणेकर असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास ऊर्फ बाली अशोक परदेशी (चाकण), अतुल मोहन रिठे (ठाकूर पिंपरी) व त्‍यांचे दोन साथीदार अशी गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी विकास आणि अतुल या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संतोष यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेल्या पैशांपेक्षा चार पट अधिक पैसे त्यांनी आरोपींना दिले होते. आरोपींनी संतोष यांच्याकडून कोरे चेक देखील घेतले होते. चारपट अधिक पैसे घेऊन देखील आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून संतोष यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

Follow Us On