Team MyPuneCity – विवाह म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन. परंतु, जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने पार पडलेला एक विवाह सोहळा फक्त ( Pimpri – Chichwad) दोन व्यक्तींच्या मिलनापुरता न राहता समाजाला एक सकारात्मक संदेश देणारा ठरला. चिंचवड येथील शुभम गार्डन येथे पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या पूर्वा बारसावडे आणि अवधूत गुंफेकर यांच्या विवाहात सात नव्हे तर आठ फेरे घेण्यात आले. आठवा फेरा “स्त्रीभ्रूण हत्येचे विरोधात” होता.
या उपक्रमाचे आयोजक महेश बारसावडे आणि सतीश गुंफेकर या दोन्ही कुटुंबांनी विवाहाच्या आधीच गुरुजींना याबाबत कल्पना दिली होती. त्यांनी नम्रतेने या उपक्रमाला साथ दिली आणि नवदांपत्याला आठवा फेरा घेण्यास प्रवृत्त केले. “ही फक्त एक धार्मिक विधी नसून, समाजप्रबोधनाचा एक प्रयत्न आहे,” असे आयोजकांनी स्पष्ट ( Pimpri – Chichwad) केले.

Pune : जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार
याच विवाहात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आगळावेगळा निर्णय घेण्यात आला. पाहुण्यांना वऱ्हाड्यांना एक झाडाचे रोप भेट देण्यात आले. एकूण ५०१ झाडांचे वाटप करण्यात आले. यामध्ये आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व टाटा मोटर्स युनियनचे प्रतिनिधी यांचा सहभाग राहिला. यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, राजाभाऊ गोलांडे, अश्विनी चिंचवडे, शिशुपाल सिंह तोमर, भैय्या लांडगे, अमित पायगुडे, बोरकर ताई, सुरेश क्षीरसागर आदी मान्यवर ( Pimpri – Chichwad) उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “समाजात बदल घडवायचा असेल, तर असे वैयक्तिक पातळीवरील उपक्रम अत्यंत प्रभावी ठरतात. आठवा फेरा हा स्त्रीभ्रूणहत्येवर प्रभावी प्रहार करणारा एक सुरेख प्रतीक आहे. तसेच प्रत्येक पाहुण्याला झाड देऊन पर्यावरणप्रेम जपणे ही काळाची गरज आहे.”
सदर विवाहातील आठवा फेरा आणि रोपवाटप उपक्रम समाजात एक सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो. “या ५०१ झाडांपैकी शंभर तरी जगवली, तरी पर्यावरण रक्षणासाठी आमचा खारीचा वाटा ठरेल आणि आमच्या लेकीसाठी हा एक अर्थपूर्ण आहेर ठरेल,” असे बारसावडे कुटुंबियांनी ( Pimpri – Chichwad) नमूद केले.