Team MyPuneCity – ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या ( Pimpri – Chichwad) शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता – भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे. त्यानिमित्ताने भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी पिंपरी चिंचवड येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तिरंगा यात्रेत हजारोंच्या संख्येने सामिल होण्यासाठी ‘ एक दिवस त्यांच्यासाठी, जे लढतात आपल्यासाठी, अवघे अवघे या‘ असे आवाहन करण्यात आले आहे.
ही तिरंगा यात्रा रविवार दि. १८ मे २०२५ दुपारी ४.३० वाजता सुरु होणार आहे. ही पदयात्रा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारक चिंचवड स्टेशन महावीर चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पर्यंत( Pimpri – Chichwad)असेल.