situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri chichwad Crime News 30July 2025 : बँक अधिकाऱ्यांकडून ४३ लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri chichwad Crime News 30July 2025

Team My pune city – अशोक नागरी सहकारी बँकेचे ( Pimpri chichwad Crime News 30July 2025) अधिकारी आणि एका व्यक्तीने मिळून एका व्यक्तीची ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे सन २०२२ पासून ते २८ एप्रिल २०२२ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.

या प्रकरणात पवन सदाशिव मिसाळ (५३, धानोरी, पुणे) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक नागरी सहकारी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जग्गुजी तनवाणी (४४), कॅशियर प्रकाश कुंभार (४५) आणि शाम सिंग (४०, वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नागरी सहकारी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जग्गुजी तनवाणी, कॅशियर प्रकाश कुंभार आणि फिर्यादीचा मित्र शाम सिंग यांनी फिर्यादीला कर्ज प्रकरण करून देतो असे सांगितले. त्यांनी फिर्यादीच्या धानोरी येथील ६ गुंठे प्लॉटपैकी ३ गुंठे प्लॉट गहाण ठेवणे अपेक्षित असताना, फिर्यादीची दिशाभूल करून संपूर्ण ६ गुंठे प्लॉट गहाणखत करून घेतले. तसेच, कॅशियर प्रकाश कुंभार याने फिर्यादीकडून प्रोसेसिंग फी, सभासद फी आणि मूल्यांकन फीच्या नावाखाली फिर्यादीचे तीन चेक घेतले. या चेकचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून आरोपी शाम सिंग याच्या नावे सेल्फ म्हणून आणि महाराष्ट्र इंटरप्राईजेस यांच्या नावे टाकून फिर्यादीची एकूण ४३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

Dr. Shripal Sabnis : अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संवाद आणि संघर्षाचे प्रतीक – डॉ. श्रीपाल सबनीस


किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षकास मारहाण ( Pimpri chichwad Crime News 30July 2025)

सुरक्षा रक्षकाला गाडी रस्त्यातून बाजूला करण्याच्या वादातून मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (२८ जुलै) सायंकाळी मुळशी तालुक्यातील द वन सोसायटी गेट समोर, मातोळवाडी, भुगाव येथे घडली.

या प्रकरणात दिलीप कुसाबा खानेकर (६९) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित अंकुश शेडगे (३५, भुगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करत असताना आरोपीने गाडी रस्त्यातून बाजूला करण्याच्या वादातून त्यांना शिवीगाळ केली. आरोपीने त्याच्या गाडीतील लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.


दुचाकी चोरी प्रकरणी एकाला अटक ( Pimpri chichwad Crime News 30July 2025)

दुचाकी चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (२८ जुलै) दुपारी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराजवळ घडली.

अक्षय बापु सागर (२६, पिंपळे सौदागर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष्मीकांत राजेश रत्नपारखी (२९, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची ४५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची दुचाकी (एमएच १४/एलवी ९६९१) आरोपी अक्षय याने चोरून नेली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही वेळेत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकास अटक ( Pimpri chichwad Crime News 30July 2025)

चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत चिखली रोड, मोई फाटा येथे अवैध दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (२९ जुलै) दुपारी करण्यात आली.

प्रशांत भारत जगताप (२३, मोईगाव, खेड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल रोहित संसारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत जगताप त्याच्या ताब्यातील ७० हजार रुपये किमतीच्या दुचाकी (एमएच १४/एलडब्लु ९२५२) वरून १२ हजार २४० रुपयांची देशी-विदेशी दारू बेकायदेशीरपणे वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी एकूण ८२ हजार २४० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आणि वाहन जप्त केले आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Rashi Bhavishya 30 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?


पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक ( Pimpri chichwad Crime News 30July 2025)

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी प्राधिकरण येथे एका तरुणाला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मंगळवार आणि बुधवारच्या रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

सुरज राजू गिराम उर्फ डोंगरे (२०, मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल हर्षद कदम यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मागील बाजूला एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सुरज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.


ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ४६ लाखांची फसवणूक ( Pimpri chichwad Crime News 30July 2025)

व्हॉट्सअॅपवरून ऑनलाइन पद्धतीने गुंतवणुकीच्या नावाखाली एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

आप्पासाहेब महादेव कोष्टी (५४, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्या स्मिथ आणि अन्य व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप ग्रुपचा ग्रुप अॅडमीन विक्रम नादार याने फिर्यादीला ‘एज्क अॅप’ मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रुपमधील लोकांना गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर स्क्रीनशॉट टाकून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादीने ३१ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवली. तसेच अन्य एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ग्रुप अॅडमीन आदित्य शर्मा/आदित्य अगरवाल यांनी एका कंपनीचे ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रुपमधील लोकांना गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर स्क्रीनशॉट टाकून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीला १७ लाख ८० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. एकूण ४६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On