situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 3 August 2025: आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा, दोघांना अटक

Published On:

Team My Pune City – एका महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना २०२२ ते १ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पिरंगुट आणि लवळे येथे घडली.

समीना सुलतान शेख (२०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी समीना यांचे वडील अब्दुलनबी रज्जाक (४५, गुलबर्गा, कर्नाटक) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुलतान रमजान शेख, लायक रमजान शेख आणि रमजान शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलतान आणि रमजान या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या २० वर्षीय मुलीला कौटुंबिक वादातून शिवीगाळ केली आणि मारहाण केली. त्यांनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. मुलगी समीना हिने शुक्रवारी (१ ऑगस्ट) राहत्या घरात आत्महत्या केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.


इंटरनेट सेवा बंद करण्याची धमकी देत कंत्राटदाराकडून घेतली खंडणी

एका कंत्राटदाराला इंटरनेट सेवा बंद करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली. कंत्राटदाराकडून १० हजार रुपये खंडणी घेत आणखी २५ हजारांची खंडणी मागून इंटरनेटची लाईन तोडून ९० हजारांचे नुकसान करण्यात आले. ही घटना २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत चऱ्होली फाटा येथे घडली.

याप्रकरणी तुषार बाळासाहेब ठाकूर (३३, सोळू, खेड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल राजाराम तापकिर (३३, चऱ्होली बुद्रुक) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून धमकावले. आरोपीने त्यांना बी.एस.एन.एल. इंटरनेट सेवेची लाइन कोणाला विचारून टाकली, तो एरिया माझा आहे, मला ५० हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी १० हजार रुपये आरोपीने ऑनलाइन घेतले. उर्वरित २५ हजार रुपयांसाठी वारंवार फोन आणि मेसेज करून खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्याने आरोपीने बी.एस.एन.एल.च्या दोन लाइन तोडून ९० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.


आयशर ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

आयशर ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवर चाकण येथे घडली.

याप्रकरणी सनी संतोष सायकर (२७, चिंबळी) यांनी फिर्याद दिली आहे. रोहन गणपत सपकाळ (२१, नारायणगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आजोबा त्यांची मोटारसायकल चालवत असताना, मागून येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांना धडक दिली. ट्रक चालकाने निष्काळजीपणे आणि वेगाने गाडी चालवल्याने हा अपघात झाला. या अपघातात फिर्यादीच्या आजोबांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


कारची रिक्षाला धडक; एकजण गंभीर जखमी

भरधाव वेगातील कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी सव्‍वाएक वाजताच्‍या सुमारास चऱ्होली येथे घडली.

सचिन आंदनराव सोरटे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्‍याचे वडिल आनंदराव दादु सोरटे (६७, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. शिवराज दशरथ करपे (वडमुखवाडी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी दुपारी ताजने मळा रोडवर फिर्यादींचा मुलगा सचिन सोरटे हा रिक्षाने प्रवास करत होता. त्‍यावेळी भरधाव वेगातील कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात सचिन हा गंभीर जखमी झाला. याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


बांधकाम पाडले तर बाळाला वरून फेकेल

अनधिकृत बांधकाम पाडण्‍यासाठी गेलेल्‍या पथकाला एक नागरिकाने तीन वर्षाच्‍या बाळाला वरून फेकेल आणि मी देखील आत्‍महत्‍या करेल, अशी धमकी दिली. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी सात वाजताच्‍या सुमारास सांगवी येथे घडली.

राजाराम साहेबराव लाड आणि निलेश राजाराम लाड (शितोळे रोड, जुनी सांगवी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअभियंता शाम नारायण गर्जे (४०) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना आरोपींनी विरोध दर्शवून पहिल्या मजल्यावर सर्व कुटुंबासह जाऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपी निलेश लाड याने तीन वर्षांच्या मुलाला उचलून ‘बांधकाम पाडले तर बाळाला खाली फेकून देईन’ अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


दोन लाखांच्‍या गांजासह तरुणास अटक

गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍याकडून दोन लाख दोन हजार रुपयांचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई भोसरी येथे शनिवारी (२ ऑगस्ट) मध्‍यरात्री भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ करण्‍यात आली.

रमेश हरीष राठोड (२५, कात्रज, पुणे; मुळ रा. कोडगंल, तेलंगणा) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक प्रकाश कृष्णा भोजणे यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्‍या सुमारास मच्छी मार्केटजवळ संशयित हालचाली करत असलेल्या आरोपीला ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडून दोन किलो ३५ ग्रॅम वजनाचा, दोन लाख दोन हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


गुटखा विक्रीप्रकरणी दुकान चालकावर गुन्हा

प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास भोसरी एमआयडीसी परिसरात करण्‍यात आली.

कमल लुणकरनजी राठी (४८, एमआयडीसी भोसरी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुनिल औटी (५१) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास राज पान शॉप येथे पोलिसांच्या तपासणी दरम्यान ३६ हजार ३२५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. आरोपी हा गुटखा साठवणूक व विक्री करत होता. दुसरा आरोपी राजु सिरवी सध्या फरार आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On