Team My pune city – अल्ट्राटेक सिमेंट एजन्सी देण्याचे आमिष दाखवून १ लाख ३८ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025) आली. ही घटना १९ जून ते २५ जुलै या कालावधीत चऱ्होली येथे घडली.
या प्रकरणी प्रशांत प्रकाश डोंगरे (३२, चऱ्होली बुद्रुक, हवेली, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या मोबाईलवर अनोळखी फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला वैभव त्रिवेदी सांगून अल्ट्राटेक सिमेंट एजन्सी घेण्यासाठी नोंदणी केली आहे का असे विचारले. फिर्यादीने हो म्हटल्यावर त्याने ३८ हजार ५०० रुपये नोंदणी शुल्क पाठवण्यास सांगितले आणि त्यानंतर एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने एकूण १ लाख ३८ हजार ५०० रुपये पाठवल्यानंतर, त्या मोबाईल क्रमांक धारकाने संपर्क तोडला. जेव्हा फिर्यादीने अल्ट्राटेक कंपनीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधून खात्री केली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
———
मोबाईल परत मागितल्याने मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
हिंजवडी येथील रेडिएशन ब्लू हॉटेलजवळ, साखरेवस्ती येथे एका व्यक्तीला मोबाईल परत मागितल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना २२ जुलै रोजी घडली.
या प्रकरणी मुखलालराम जगदीश भुईयां (४४, हिंजवडी, पुणे, मूळगाव बुल्काथानारमना, झारखंड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल साखरे (३५, साखरेवस्ती, हिंजवडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीला फोन करण्यासाठी आपला मोबाईल दिला होता. तो मोबाईल परत मागितल्यावर आरोपी चिडून गेला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली आणि लाकडी बांबूने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले, ज्यामुळे त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या सागर आणि आयबू गायकवाड यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
Chakan MIDC : ‘‘UNCLOG Chakan MIDC’’ साठी आमदार महेश लांडगे ‘ऑन फिल्ड’
———-
ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
जुना पुणे मुंबई महामार्गावर दापोडी मेट्रो स्थानकाजवळ एका टाटा कंपनीच्या ट्रकने धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२५ जुलै) दुपारी साडेतीन वाजता घडली.
अपेक्षा थोरात असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अशोक महादू थोरात (५५, लोहगाव, पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एम एच-१२ एल टी ४५३७) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची मुलगी अपेक्षा ही तिच्या मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ती खाली पडली आणि ट्रकचे पुढील चाक तिच्यावरून गेल्याने तिचा अपघातात मृत्यू झाला. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
————
महिलेच्या घरातून १२ जिवंत राऊंड जप्त ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
आळंदी येथील संस्कार हाईट्समधील एका फ्लॅटमधून १२ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. त्यानुसार संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश चिटमपल्ले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याशी संबंधित पोलिसांनी आरोपी महिलेच्या घराचे झडती घेतली या झेडपी मध्ये महिलेच्या घरात बारा जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद
——
पिंपळे निलख येथे १४६ ग्रॅम चरस जप्त ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
पिंपळे निलख येथील पुष्पा पॅलेस येथे वाकड पोलिसांनी १४ हजार ६०० रुपये किमतीचे १४६.८६ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (२५ जुलै ) पहाटे करण्यात आली.
अमित दुबे (४५, पिंपळे निलख, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद घुले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित दुबे याच्या राहत्या घरातून १४६.८६ ग्रॅम वजनाचा १४ हजार ६०० रुपये किमतीचा चरस हा अंमली पदार्थ अनाधिकाराने आणि बेकायदेशीररित्या ताब्यात बाळगताना आढळून आला. वाकड पोलीस तपास करत आहेत.
————
गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
गांजा विक्री प्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (२५ जुलै) चिंचवड येथील अजंठानगर येथे करण्यात आली.
संपत काका मिसाळ (२२, चिखली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संपत मिसाळ त्याच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये १६ हजार ५०० रुपये किमतीचा ३३० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने आणि बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगताना आढळून आला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
———-
पिंपरी मध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
पिंपरी येथील निराधार नगरमधील अंतर्गत रोडवर ३०,००० रुपये किमतीचा ६४० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै ) रात्री करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र तळपे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गौरव महेश कजानिया (२७, पिंपरी, पुणे) याला अटक केली आहे. त्याच्यासह गणेश भुंगा कांबळे (पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव कजानिया याने ३० हजार रुपये किमतीचा ६१८ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ अनाधिकाराने आणि बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगला. त्याने हा गांजा आरोपी गणेश कांबळे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
———
दुकानदाराला मारहाण करून खंडणी उकळली ( Pimpri Chichwad Crime News 26 July 2025)
चिंचवड येथील धनलक्ष्मी सुपर शॉपी, जिजामाता चौक, वाल्हेकरवाडी येथे एका दुकानदाराला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत आणि मोबाईलमधील फोटो डिलीट करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी १,४९,४०० रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळण्यात आली. ही घटना १२ ते २५ जुलै या कालावधीत घडली.
या प्रकरणी पिंन्दुजगदीश हिरागर (२५, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव धन्नेकुमार कांबळे (२५, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) याला अटक करण्यात आली असून, अमर अंम्बाड (२५, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी आणि आरोपी वैभव याच्या पत्नीच्या मोबाईलमधील फोटो पाहून पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देऊन फिर्यादीला त्यांच्या गाडीतून जबरदस्तीने लंडन ब्रिजखाली नदीकिनारी, रावेत येथे तसेच येरवडा येथे घेऊन गेले. फिर्यादीच्या मोबाईलमधील फोटो डिलीट करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी खंडणी म्हणून टप्प्याटप्प्याने १,४९,४०० रुपये ऑनलाईन घेतले. तसेच, आरोपी अमर याने फिर्यादीकडून ३,००० रुपये ऑनलाईन खंडणी घेतली. आरोपींनी फिर्यादीचा ७०,००० रुपये किमतीचा आयफोन-१५ हा मोबाईल घेऊन गेले असून, पुन्हा ५०,००० रुपयांची खंडणी मागितली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.