Team MyPuneCity – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२४ जून) रात्री वाल्हेकरवाडी चिंचवड ( Pimpri Chichwad Crime News 25 June 2025) येथे करण्यात आली.
विशाल सुनील काळे (२९, शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी मुंढे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथे केजुबाई बंधारा येथे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण पिस्तूल घेऊन आला असून त्याच्याकडे असलेले पिस्तूल बेकायदेशीर आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विशाल काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
Pune : चंद्रकांत सदाशिव भापकर यांना ‘योगरत्न’ पुरस्कार
हॉटेल चालकासह तिघांना मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 25 June 2025)
हॉटेल मध्ये आलेले दोघेजण हॉटेल मधील ग्राहकांशी वाद घालत होते. त्यामुळे हॉटेल चालकाच्या पत्नीने जाब विचारला असता दोघांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (२३ जून) सायंकाळी भोसरी येथे घडली.
जयराम अण्णाराव बिरादार (४७, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज गायकवाड, कुमार रामभाऊ ठोके (भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम बिरादार यांचे भोसरी येथे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेल मध्ये आरोपी आले. त्यांनी हॉटेल मधील ग्राहकांशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिरादार यांच्या पत्नीने आरोपींना जाब विचारला. या कारणावरून आरोपींनी बिरादार यांच्या पत्नीला मारहाण केली. भाचा दत्तात्रय भांडण सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. तसेच फिर्यादी यांनाही मारहाण केली.
हातोडीने डोक्यात मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 25 June 2025)
घरात बसलेल्या व्यक्तीच्या पाठीमागून येऊन डोक्यात हातोडीने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (२३ जून) सकाळी पिंपळे गुरव येथे घडली.
वैभव असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समर्थ महावीर सुतार (पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती वैभव घरी सोफ्यावर बसले होते. त्यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी घरकाम करणाऱ्या महिलेचा मुलगा समर्थ हा वैभव यांच्या पाठीमागून आला. त्याने वैभव यांच्या डोक्यात हातोडीने मारून गंभीर दुखापत केली.
हॉटेलमधील कामगाराला विनाकारण मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 25 June 2025)
हॉटेल मध्ये काम करणारा कामगाराला मारहाण करून हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (२३ जून) दुपारी आशापुरा हॉटेल बावधन येथे घडली.
चोथाराम प्रेमाजी देवासी (२७, बावधन) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य बिचवडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी हे आशापुरा हॉटेल मध्ये काम करतात. सोमवारी दुपारी आरोपी हॉटेल मध्ये आले. त्यांनी देवासी यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर हॉटेल मालक पुआराम यांना जीवे मारण्याची धमकी देत हॉटेल मधील साहित्याची तोडफोड केली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची ३८ लाखांची फसवणूक ( Pimpri Chichwad Crime News 25 June 2025)
घर खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीने बँकेत सादर केली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून घर खरेदी न करता नुकसानभरपाई बंधपत्र दिले. दरम्यान, बँकेचे हप्ते न भरता बँकेची ३८ लाखांची फसवणूक केली. ही घटना २८ डिसेंबर २०२१ ते ११ मार्च २०२४ या कालावधीत युको बँक शाखा चिखली येथे घडली.
याप्रकरणी ३१ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश नरेन निहलानी (५०, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहलानी याने कोंडेश्वर को ऑप हाऊसिंग सोसायटी तळेगाव येथे फ्लॅट घेण्यासाठी रेनएसेन्स एंटरप्रायजेस व कोंडेश्वर सोसायटी यांच्यासोबत एग्रीमेंट टू सेल तयार केले. करारपत्राच्या आधारावर त्याने युको बँकेकडून ३८ लाख रुपये होमलोन घेतले. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकाची बनावट कागदपत्रे त्याने बँकेत जमा केली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून फ्लॅट न घेता त्यास नुकसानभरपाई बंधपत्र दिले. दरम्यान, बँकेचे दोन वर्ष हप्ते भरून नंतर हप्ते न भरता बँकेची ३८ लाखांची फसवणूक केली.
Maharashtra Brahmin Sabha: “मस्तानीबाईंचा अपमान सहन केला जाणार नाही!”; महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा