situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 : पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या दागिन्यांची फसवणूक

Published On:
Pimpri Chichwad Crime News 17 July 2025

Team My pune city – बावधन परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून तीन अनोळखी व्यक्तींनी एका ( Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 ) महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी (१६ जुलै) सकाळी सिद्धार्थनगर तरुण मंडळ वाचनालयासमोर, बावधन येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डी पॅलेस चौक, बावधन येथून पायी घरी जात असताना, सिद्धार्थ नगर तरुण मंडळ वाचनालयासमोर उभ्या असलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी त्यांना थांबवले. त्यानंतर मागून आलेल्या तिसऱ्या अनोळखी पुरुषाने “मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, तुम्ही मंगळसूत्र घालू नका, आता भरपूर चोऱ्या होत आहेत, बऱ्याच चोरी करणाऱ्या टोळ्या आल्या आहेत” असे सांगितले. त्यांनी फिर्यादीचे एक लाख ४८ हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन बांगड्या पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने काढून घेतले व फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.


कौटुंबिक वादातून मारहाण, एकजण गंभीर जखमी ( Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 )

चाकण येथील मेदनकरवाडी येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (१३ जुलै) रोजी रात्री येथे घडली.

या प्रकरणी बाळासाहेब पोपट मेदकर (५५, मेदनकरवाडी चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित सुभाष मेदनकर (४०, मेदनकरवाडी चाकण), सुभाष लक्ष्मण मेदनकर (७०, मेदनकरवाडी चाकण) आणि अंजली सुभाष मेदनकर (६५, मेदनकरवाडी चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ, चुलते आणि चुलती हे फिर्यादीच्या घरासमोर खडीची हायवा गाडी घेऊन खाली करण्यासाठी आले होते. फिर्यादीने त्यांना गावठाण जागेत गाडी खाली करू नका असे सांगितले असता, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. आरोपी अमित याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या छातीवर डाव्या बाजूस मारून त्यांच्या डाव्या बाजूच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Selling Drugs : ड्रग्स विक्रीप्रकरणी डॉक्टरला अटक, 11 लाखांचे मेफेड्रॉन जप्त


भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले ( Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 )

चाकण येथे भरधाव वेगात आलेल्या एका कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (१६ जुलै) रात्री चाकण गावच्या हद्दीत दावडमळा चाकण ते आंबेठाण रोडवर घडली.

या प्रकरणी प्रनेश सुरेश ओव्हाळ (२४, चिंचवस्थळ, भोसे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आप्पा लक्ष्मण नाईकवाडे (३५, दावड मळा चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ सुशांत सुरेश ओव्हाळ (३२, भोसे) हा स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच१४/एलएन ९६३३) चालवत होता आणि त्याच्यासोबत कविता नवनाथ गाडे (४१, शेलु) ही महिला पाठीमागे बसली होती. ते चाकण गावच्या हद्दीत दावडमळा चाकण ते आंबेठाण जाणारे रोडवर भारत पेट्रोल पंपा समोर बी.एस.एन.एल. टॉवर जवळून जात असताना, इरटीगा कार (एमएच १२/एस ६२२१) चालवणाऱ्या आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून सुशांत यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात सुशांतच्या डोक्यास, हाता-पायास, तोंडास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच, पाठीमागे बसलेल्या कविता गाडे यांच्या डोक्यास, कंबरेस, पोटास मार लागून कंबर फ्रॅक्चर झाली. मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.


गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 )

निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील थरमॅक्स चौकाजवळ प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाला विक्री करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी (१६ जुलै) दुपारी सिद्धेश्वर इंटरप्रायझेस व पान शॉप नावाची टपरीमध्ये करण्यात आली.

फरदिन फिरोज शेख (२०, शरदनगर, चिखली, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा टपरी चालवतो. त्याने त्याच्या टपरीमध्ये २३ हजार ४८० रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपन्यांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि पानमसाला व सिगारेट पाकिटे स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या खरेदी करून विक्रीसाठी ठेवली. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. गुटख्याचा साठा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे ‘स्पायडर वॉक’ आणि ‘मॉथ वीक’ उपक्रम , येत्या रविवारी जुलै रोजी निसर्गप्रेमींना खास संधी


बांधकाम साईटवर निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू, एक जखमी ( Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 )

आळंदी येथील बांधकाम साईटवर सुरक्षेची खबरदारी न घेतल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला असून, दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (१५ जुलै) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल दुधमल यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुलगफार अब्बास राय (५२, चर्होली खुर्द) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत यशवंत सुतार (५३, वडगाव रोड, आळंदी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. निरहार भिमन्ना मेलकेरी (४३, चऱ्होली बुद्रुक) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद बापू साळुंखे यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू असताना, इमारतीच्या बांधकामाचे ठेकेदार, आरोपीने तिसऱ्या मजल्यावर काम चालू असताना देखील इमारतीच्या बाहेरील बाजूने मजुरांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी संरक्षण जाळी लावली नाही. तसेच, मजुरांची सुरक्षेची खबरदारी म्हणून त्यांना हेल्मेट व हार्नेस न दिल्याने आणि निष्काळजीपणा केल्याने दोन्ही कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना खाली रोडवर पडले. यात चंद्रकांत सुतार यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच, निरहार मेलकेरी हे गंभीर जखमी झाले. आळंदी पोलीस तपास करत आहेत.


लॉटरी सेंटर मधील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ( Pimpri Chichwad Crime News 17 July 2025 )

भोसरी येथील ओम साई लॉटरी, विशाल वाईन्स शेजारी, पीएमटी चौक येथे इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (१६ जुलै) सायंकाळी करण्यात आली.

अमन राजकुमार कोहली (३२, आकुर्डी), केतन दिलीप घाडगे (३२, धावडे वस्ती भोसरी), जुगार खेळणारे बसवेश्वर सभांप्पा देवकर (५२, महादेव नगर, भोसरी), अमोल अभिमन्यु शिंदे (३८, गवळी नगर, भोसरी), गुलाब रफिक शेख (२५, बालाजी नगर, भोसरी), करण भीमाशंकर कांबळे (३४, आदेश नगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ताटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद आरोपी इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैशांवर आकडे लावून जुगार खेळत होते. या जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये ८० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On