situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 16 June 2025: गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity -अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख ५७ हजार २९२ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (१५ जून) दुपारी चऱ्होली येथे करण्यात आली.

संदीप रामराव सूर्यवंशी (२५, चऱ्होली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश कसबे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप याने व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मधून घरगुती वापराच्या सिलेंडर मध्ये चोरून, धोकादायकपणे गॅस काढला. रिफिल केलेले सिलेंडर बाजारात चढ्या दराने विकले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संदीप याच्या दुकानावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. दुकानातून सिलेंडर, गॅस काढण्याचे साहित्य असा एकूण एक लाख ५७ हजार २९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

गुटखा विक्री प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (१४ जून) सायंकाळी नाणेकरवाडी, चाकण येथे करण्यात आली.

रुद्रप्रताप गणपतसिंग देवरा (२८, नाणेकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोकणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवरा याचे नाणेकरवाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा देवरा याने त्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी दुकानावर कारवाई करत एक लाख २४ हजार ८६७ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.


विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात, चालकाचा मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका व्यक्तीने त्याच्या ताब्यातील कार विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. या अपघातात विरुद्ध दिशेने आलेल्या कार चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१४ जून) दुपारी उर्से टोलनाक्याजवळ घडली.

विशाल पुंडलिक बडीगीर (३९, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी गमनाराम रणछोडदास चौधरी (३२, पुनावळे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल बडीगीर याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच १४/केव्ही ०२१४) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालवली. या कारची समोरून आलेल्या गमनाराम यांच्या कारला जोरात धडक बसली. या अपघातात विशाल बडीगीर याचा मृत्यू झाला. तर गमनाराम चौधरी हे जखमी झाले.


भरधाव कारची दोघांना धडक, एकाचा मृत्यू

मोशी-चाकण मार्गावर भरधाव कारने दोन पादचारी तरुणांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (१४ जून) सायंकाळी कुरुळी येथे घडली.

अमोल उत्तम उतेकर (२६, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम संतोष गोळे (२२, रायगड) हे जखमी झाले आहेत. शुभम यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक संदीप किसन मोरे (४४, जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप हा त्याच्या ताब्यातील कार (एमएच ५०/यु ३४१२)ने मोशी ते चाकण दरम्यान भरधाव वेगात जात होता. कुरुळी येथे अमोल उतेकर आणि शुभम गोळे हे रस्त्याने पायी जात होते. संदीप याने त्याच्या ताब्यातील कारने दोघांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अमोल यांच्या हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर शुभम हे गंभीर जखमी झाले आहेत.


ट्रान्सपोर्टचे पैसे न दिल्याने मारहाण

ओडिशा येथे माल पोहोचविल्याचे पैसे न दिल्याने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला त्याच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (१४ जून) रात्री चिखली येथे घडली.

अमरदीप श्री सत्यनारायण तिवारी (३९, देहूरोड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉनर रिचर्ड उर्फ राजेश (४५, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिवारी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या कार्यालयात असताना आरोपी राजेश तिथे आला. ओडिशा येथे माल पोहोचविल्याचे ट्रान्सपोर्टचे पैसे का देत नाही, असे म्हणत त्याने तिवारी यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दारूची बाटली डोक्यात मारून तिवारी यांना जखमी केले.


पार्किंग साठी पैशांची मागणी करत टोळक्याची दहशत

पार्किंग करण्यासाठी पैशांची मागणी करत रिक्षाची कोयत्याने तोडफोड करून चार जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१५ जून) बालाजीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अशोक गोंधणे (२०), रोहित पारवे (२१), अरुण गोटे (२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहित अरुण गायकवाड (२७, बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड त्यांच्या घराजवळ रिक्षा पार्क करत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. गाडी पार्क करण्यासाठी पैशांची मागणी करत त्यांच्या खिशातून जबरदस्तीने ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर कोयत्याने रिक्षाची तोडफोड करून धमकी दिली. आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला कोणी नडला तर त्याला ठार मारू, अशी आरोपींनी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.


हात पाय बांधून मारहाण करत तरुणाचा खून

तरुणाचे हात पाय बांधून मारहाण करत महिलेने खून केला. ही घटना १२ जून रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली.

कमल रामदयाल मधुकर (३०, छत्तीसगड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कमल याच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३० वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल मधुकर हा आरोपी महिलेच्या घरी गेला होता. त्यावेळी कमल आणि आरोपी महिला यांच्यात प्रेम संबंधाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून महिलेने कमल याचे हातपाय बांधून त्याला बॅटने मारहाण केली. यामध्ये कमल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

Follow Us On