Team My pune city – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी बावधन पोलिसांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी (13 जुलै) करण्यात ( Pimpri Chichwad Crime News 14 July 2025) आली.
राजप्रताप प्रद्युमन पटेल (20), नितेश रामेश्वर भारती (25, लवळे फाटा, मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बंडू मारणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुगाव रोड येथे एका दुचाकीवरून दोघेजण संशयीत रीत्या जात असताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक कोयता आढळून आला. पोलिसांनी दुचाकी आणि कोयता जप्त करत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune : ‘अहिरभैरव’, ‘ललत’, ‘परमेश्वरी’, बिलासखानी ‘सारंग’चे सुमधुर सादरीकरण
शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक ( Pimpri Chichwad Crime News 14 July 2025)
शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई रविवारी (13 जुलै) सायंकाळी देवकर वस्ती भोसरी येथे करण्यात आली.
अजय सुखदेव माने (25, भोसरी), सोमनाथ अंकुश पवार (29, लोहगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय तेलेवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर वस्ती भोसरी येथील देवकर यांच्या मोकळ्या जागेत दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अजय माने आणि सोमनाथ पवार या दोघांना ताब्यात घेतले. अजय माने याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस तर सोमनाथ पवार यांच्याकडून एक कोयता अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 14 July 2025)
अवैधरित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रविवारी (13 जुलै) सकाळी खंडे वस्ती भोसरी येथे करण्यात आली.
लोकेन्द्र ख्मान सिंग (25, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडे वस्ती भोसरी येथे एका इमारतीच्या पार्किंग मध्ये आरोपी लोकेंद्र सिंग हा बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस रिफील करत होता. ग्राहकांना विक्री करण्यासाठी टेम्पोतून आणलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडर मधून चोरी केली जात होती. दरम्यान लोकेंद्र याने गॅस रिफील करताना कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत लोकेंद्र याला अटक केली आहे.
Crime News : दुकानात शिरून महिलेला मारहाण करत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, कुसगाव येथील घटना
पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार ( Pimpri Chichwad Crime News 14 July 2025)
जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. घरांवर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (१२ जुलै) रात्री ओटास्किम, निगडी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
साहिल गुलाब शेख (२२, निगडी), शंतनू सुनील म्हसुडगे (२४, रावेत), अविनाश भाऊ आव्हाड (२६, किवळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह युवराज अडागळे आणि चिराग उर्फ लल्ला चंडालिया यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज अडागळे याचे फिर्यादी महिलेचे पती आणि सोहेल जाधव यांच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांचे वडील विजय ढोणे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांच्या घरावर दगड मारले. एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत हवेत कोयते नाचवून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या घरावर दगडे मारून तिच्या दुचाकीसह अन्य चार दुचाकींची तोडफोड करत नुकसान केले.