Team MyPuneCity – गांजा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (12 मे) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मारुंजी(Pimpri Chichwad Crime News 13 May 2025) येथे करण्यात आली.
अंगद दत्ता मुटकुळे (20, मारुंजी मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल भोईर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील लक्ष्मी चौकातून मारुंजी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण संशयितरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार 950 रुपये किंमतीचा 519 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी अंगद मुटकुळे याला अटक केली आहे.
Daund News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या दौंड तालुका शाखेचा शुभारंभ
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक (Pimpri Chichwad Crime News 13 May 2025)
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (12 मे) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर भोसरी येथे करण्यात आली.
आकाश अनिल मिसाळ (24, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महादेव गारोळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर भोसरी येथील पाटील नर्सिंग होम चौकात एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयित तरुण आकाश मिसाळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 20 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. पोलिसांनी आकाश मिसाळ याला अटक केली आहे.
Railway Passengers : खासदार साहेब, आणखी किती सहन करायचं?, मावळातील रेल्वे प्रवाशांचा सवाल
कारच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू (Pimpri Chichwad Crime News 13 May 2025)
थेरगाव येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणाला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी कार चालक पळून गेला आहे. हा अपघात रविवारी (11 मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला.
बलवीर हरीसिंग गुर्जर (31, थेरगाव. मूळ रा मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बलवीर यांचा भाऊ नरेंद्रसिंह हरीसिंह गुर्जर (32) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/जीएन 4001) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलवीर गुर्जर हे रविवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ते थेरगाव येथील डांगे चौकात रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात बलवीर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता तसेच जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल न करता आरोपी कार चालक पळून गेला.