Team MyPuneCity – तुझी मावशी कुठे आहे असे विचारत एका व्यक्तीने दोन तरुणांवर चाकूने वार केले. ही घटना गुरुवारी (12 जून) रात्री गवारेवस्ती हिंजवडी येथे ( Pimpri Chichwad Crime News 13 June 2025) घडली.
अंकज प्रदीपराव तायडे (29), पंकज प्रदीपराव तायडे (32, गवारेवस्ती हिंजवडी) अशी जखमींची नावे आहेत. अंकज तायडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल (पूर्ण नाव माहिती नाही, 38, यवतमाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल गुरुवारी रात्री तायडे यांच्या घरी आला. त्याने तायडे यांच्या मावशी बद्दल विचारत अंकज यांच्यावर चाकूने वार केले. अंकज तायडे ओरडत असताना त्यांचा भाऊ पंकज तायडे घराबाहेर आले. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेला.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पादचारी तरुणाचा मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 13 June 2025)
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर पायी चालत जाणाऱ्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (11 जून) रात्री उर्से गावाजवळ घडला.
अक्षय संतोष पाळेकर (22, बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ बगाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अक्षय पाळेकर पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने चालत जात होते. उर्से गावाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला.
Bavdhan Accident News : बावधनजवळ कंटेनरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
दुकानातील कामगाराला दोन मद्यपींकडून मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 13 June 2025)
दारू पिऊन आलेल्या दोघांनी दुकानातील कामगाराला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (12 जून) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास जेके टायर पिंपरी येथे घडली.
मोहम्मद रईस राईन (40, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मन्या उर्फ मनोज आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हे पिंपरी येथील जेके टायर दुकानात काम करतात. ते दुकानात असताना आरोपी दारू पिऊन तिथे आले. त्यांनी विनाकारण मोहम्मद यांना शिवीगाळ केली. याबाबत मोहम्मद यांनी जाब विचारला आणि मालकाला फोन करण्यासाठी मोबाईल काढला. आरोपींनी मोहम्मद यांचा मोबाईल खाली फेकून नुकसान केले. त्यानंतर त्यांना दगडाने मारून जखमी केले.
हॉटेलमधील किरकोळ वादातून मित्राला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 13 June 2025)
हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून एका मित्राला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (12 जून) दुपारी मोशी टोलनाका येथे घडली.
दीपक रावसाहेब साठे (26, मोईगाव, खेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक आणि त्यांचा मित्र विनोद व शेखर चव्हाण हे गुरुवारी दुपारी मोशी टोलनाका येथील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले. हॉटेलमध्ये जेवण करत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून विनोद याने दीपक यांना मारहाण करून ढकलून दिले. त्यामुळे दीपक यांच्या डोक्याला दुखापत झाली. भांडण झाल्यानंतर विनोद आणि शेखर हॉटेलमधून निघून जात असताना दीपक यांनी त्यांना जाब विचारला. त्यानंतर पुन्हा विनोद याने दीपक यांना मारहाण करून जखमी केले.
Dehuroad murder case : देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला गुजरात मधून अटक
रस्ता बंद असल्याचे सांगितल्याने एकास मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 13 June 2025)
पुढे रस्ता बंद आहे असे दुचाकीस्वाराला सांगितल्याने दुचाकीस्वार आणि त्याच्या दोन मित्रांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (11 जून) सायंकाळी कासारसाई डॅम जवळ घडली.
इकबाल पापामीया शेख (42, कासारसाई) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य जाधव, रोहन शिंदे आणि त्यांच्या एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुलेट दुचाकीवरून कासारसाई डॅमकडे जात होते. त्यावेळी इकबाल यांनी आरोपींना पुढे रस्ता बंद आहे, असे सांगितले. या कारणावरून आरोपींनी इकबाल यांना शिवीगाळ करून लोखंडी सळईने डोक्यात मारून जखमी केले.
बांधकाम व्यवसायिक कंपनीची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल ( Pimpri Chichwad Crime News 13 June 2025)
बांधकाम व्यवसायिक कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीची 24 लाख 55 हजार 518 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत ॲशडॅन व्हीटीपी डेव्हलपर्स या कंपनीत घडली.
सौरभ सुनील शिंदे (मार्केट यार्ड, पुणे) आणि इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविंद्र वाघू तुपे (49, आंबेगाव बुद्रुक) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ शिंदे हा फिर्यादी यांच्या ॲशडॅन व्हीटीपी डेव्हलपर्स या कंपनीत काम करत होता. कंपनीकडून सदनिका धारकांना सदनिकांचा ताबा देण्यास उशीर झाला. त्यामुळे महारेरा कायद्यानुसार कंपनीकडून सदनिका धारकांना द्यावयाची व्याजाच्या स्वरूपात देय रक्कम आरोपीने स्वतःकडे घेतली. तसेच सदनिका धारकांनी मागणी केलेली कामे करून देण्यासाठी कंपनीचे साहित्य, लेबर वापरून सदनिका धारकांकडून विविध बँक खात्यावर पैसे घेतले. त्यानंतर ते पैसे आरोपीने स्वतःच्या खात्यावर घेत कंपनीची 24 लाख 55 हजार 518 रुपयांची फसवणूक केली.