situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 12 June 2025 : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

Updated On:
Pimpri Chinchwad Crime News 12 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी एका पान टपरी चालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (11 जून) मारुंजी (Pimpri Chichwad Crime News 12 June 2025) येथे करण्यात आली.

सोनू देवलाल पटेल (31, मारुंजी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव गावंडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू पटेल हा चव्हाण मळा मारुंजी येथे पान टपरी चालवितो. त्याने टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सोनू पटेल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 12 हजार 92 रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे.


शतपावली करणाऱ्या तीन महिलांना मारहाण (Pimpri Chichwad Crime News 12 June 2025)

संध्याकाळी जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या तीन महिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (10 जून) रात्री चऱ्होली बुद्रुक बाजारपेठ येथे घडली.

या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला आणि प्रशांत प्रल्हाद ढोरजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांची आई आणि मावशी असे सायंकाळी जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर फेऱ्या मारत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या मावशीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता इतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची आई आणि मावशीला बेदम मारहाण करून जखमी केले.

Nigdi : वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण


हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून एकास मारहाण (Pimpri Chichwad Crime News 12 June 2025)

दोघांना अटक

हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (10 जून) रात्री किवळे येथील कुणाल हॉटेलमध्ये घडली.

आदित्य भीमराव जाधव (22), सुजल प्रकाश जाधव (22, मामुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश भाऊ आव्हाड (30, मामुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि त्यांचा मित्र राजू हिंगे हे किवळे येथे कुणाल हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यावेळी आरोपी सुजल जाधव याने राजू हिंगे यांना एका एकाला कापून टाकायचे आहे अशी धमकी दिली. त्यामुळे आकाश यांनी आरोपींना समजावून सांगत त्यांच्या जागी बसण्यास सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी आकाश यांच्या डोक्यात बियरची बाटली मारून जखमी केले. त्यानंतर आकाश यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.


इथे धंदा करायचा नाही असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण (Pimpri Chichwad Crime News 12 June 2025)

मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळ रिक्षा घेऊन आलेल्या एकास दोघांनी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (11 जून) पहाटे घडली.

संदीप उल्हास गोडसे (43, वडगाव मावळ) असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम विष्णू शिंदे (45, आंबी मावळ), संजय आम्रता शिंदे (42, वडगाव मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गोडसे हे त्यांचे रिक्षा घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळ गेले. त्यावेळी आरोपी रीक्षातून तिथे आले. त्यांनी रिक्षातून बांबू काढून संदीप यांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तू इथे रिक्षा घेऊन यायचे नाही. धंदा करायचा नाही, असे म्हणत मारहाण केली. महामार्ग पोलीस घटनास्थळी येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले.

Dehuroad Murder News : लव्ह ट्रँगलमधून तरुणाचा खून


ग्राहकांना पार्सल न दिल्या प्रकरणी फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा (Pimpri Chichwad Crime News 12 June 2025)

ग्राहकांना त्यांचे पार्सल न देता कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 मार्च ते 11 मे या कालावधीत वाकड येथे घडली.

संकेत दीपकराव कडू (23, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश रतिलाल शहा (65, बिबवेवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत हा फ्लिपकार्ट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याने इन्स्टाकार्ड कंपनीतर्फे फ्लिपकार्ट कंपनीच्या ग्राहकांना डिलिव्हरी करण्यासाठी दिलेले 36 पार्सल ग्राहकांना न देता कंपनीची 21 हजार 123 रुपयांची फसवणूक केली.


धारदार शस्त्राने वार करत खुनी हल्ला (Pimpri Chichwad Crime News 12 June 2025)

शास्त्राने वार करत चौघांनी एकावर खुनी हल्ला केला. तसेच त्याच्या मित्राला मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (10 जून) रात्री मोहननगर चिंचवड येथे घडली.

राहुल मारुती शिंदे (32, मोहननगर, चिंचवड), अक्षय कसबे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. राहुल शिंदे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल उर्फ सोन्या भालेराव (29, पिंपरी), कृष्णा उर्फ बाळा शिवाजी वारभवन (24, पिंपरी), उमेश पवार (26, चिंचवड), मंगेश पवार (24, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल भालेराव याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर चिंचवड येथे आरोपींनी फिर्यादी राहुल यांचा मित्र अक्षय कसबे याला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. आरोपींना घाबरून अक्षय हा रिक्षा घेऊन चिंचवड स्टेशनकडे पळून गेला. त्यावेळी राहुल शिंदे तिथे एकटेच होते. आरोपींनी राहुल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी चार चाकी वाहनातून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On