Team My Pune City –एका व्यक्तीचे चाकूच्या धाकावर अपहरण करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी मारुंजी येथे घडली आहे.
याबाबत लालबाबुकुमार रामइक्बाल प्रसाद (२८, शिंदेवस्ती मारुंजी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सत्यवान तापकीर (२९, ताजणेमळा, चऱ्होली बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हे काम संपवून घरी जात असताना आरोपी आकाश याने त्यांना थांबवले. आकाशने प्रसाद यांच्या गळ्याला चाकू लावून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर प्रसाद यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. प्रसाद यांच्याकडून २५ हजार रुपये खंडणी घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
Pune Ganeshotsav : पुण्यात साडे सहा लाख गणेशमूर्तींचे विसर्जन; 876 टन निर्माल्य संकलन, मात्र मूर्ती दानात घट
MLA Sunil Shelke : टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा
दहशत माजवून वाहनांची तोडफोड, खंडणीची मागणी
चिंचवड येथील विद्यानगर परिसरात तीन तरुणांनी कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन( Pimpri Chichwad Crime News 09 September 2025)दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. तसेच त्यांनी एका व्यक्तीकडे खंडणीचीही मागणी केली. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री गोल्डन चौक, विद्यानगर येथे घडली.
या प्रकरणी परशुराम रमाप्पा बसरकोड (५४, विद्यानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजल सूर्यवंशी आणि तन्मय चव्हाण (दोघेही दत्तनगर, चिंचवड) तसेच अमोल (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुजल सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडे २००० रुपयांची खंडणी मागितली आणि त्यांच्याकडून १२०० रुपये जबरदस्तीने घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घराजवळ आले आणि ‘भाईचा बर्थडे आहे, सगळ्यांनी पैसे द्या’ असे ओरडून त्यांनी हातातील कोयते आणि लोखंडी रॉड हवेत फिरवत दहशत निर्माण केली. यामुळे परिसरातील लोक घाबरून घरात पळून गेले. आरोपींनी फिर्यादीच्या इनोव्हा गाडीच्या पुढील, मागील आणि उजव्या बाजूच्या काचा फोडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यांनी इतर वाहनांचीही तोडफोड करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नदीघाटावर राहणाऱ्या तरुणाला मारहाण
आळंदी येथे नदी घाटावर राहणाऱ्या एका तरुणाला तू येथे राहू नकोस असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी घडली.
राजेश अशोक होनपट्टे (२९, आळंदी घाट, आळंदी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाऱ्या उर्फ नारायण भानुदास गायकवाड (२५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीला ‘तू आळंदी घाटावर राहू नकोस’ असे बोलून शिवीगाळ करत होता. त्यानंतर त्याने एका लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि डाव्या पायावर मारहाण केली. तसेच, त्याने हाताने आणि लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रकच्या धडकेमुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी सोमाटणे फाट्याजवळील पायोनियर हॉस्पिटलसमोरील हायवेवर घडली.
हनुमंत कुचेकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजोग सुभाष जोरी (३२, माळवाडी, हडपसर) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (केए २८/एए ८९२६) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मेहुणे हनुमंत कुचेकर हे कामावर जात असताना एका अज्ञात ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी घसरून कुचेकर रस्त्यावर पडले. त्यांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.