situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 08 September 2025: व्यावसायिकाच्या खात्यातील ५ लाख रुपयांचा गैरवापर

Published On:
Pimpri Chichwad Crime News

Team My Pune City – एका महिलेच्या बँक खात्यातील ५ लाख रुपये तिच्याच मैत्रिणीने वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आणि ७ व ८ जानेवारी २०२५ रोजी धन्वंतरी क्लिनिक, काळेवस्ती, चऱ्होली येथे घडली. आरोपी महिलेने तिच्या कंपनीचा आयडी वापरून तिच्या मैत्रिणीच्या नावे परस्पर खरेदी केली.

या प्रकरणात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ४२ वर्षांची असून, ती मांजरी, पुणे येथील रहिवासी आहे. त्यानुसार दोन महिला आणि अभिजीत राजन कानगुडे (रा. तनिष ऑर्चिड, चऱ्होली) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने व्यवसायाबाबत चर्चा करण्यासाठी आरोपी महिलेला तिचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिले होते. आरोपीने त्या माहितीचा उपयोग करून कोणताही करार केला नाही आणि करार करण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपीने पीडित महिलेकडून व्यवसायासाठी ७ आणि ८ जानेवारी रोजी घेतलेले ५ लाख रुपये तिच्या वैयक्तिक कामासाठी वापरले. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी १० जानेवारी २०२५ रोजी क्यूनेट कंपनीसोबत केलेल्या खरेदीचा संबंध ७ आणि ८ जानेवारी रोजीच्या व्यवहाराशी जोडला. दिघी पोलीस तपास करत आहेत.


चित्रपटगृहात शांत बसण्यास सांगितल्याने एकास मारहाण

चित्रपटगृहात शांत बसण्याची विनंती केल्यामुळे एका तरुणावर हल्ला करण्यात आला. ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० ते ९:४५ च्या सुमारास चिंचवड येथील आयनॉक्स थिएटर, एलप्रो मॉल येथे घडली.

या प्रकरणात अभिषेक प्रफुल्ल देशपांडे (२९, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकिब जावेद निसार पटेल आणि त्याची पत्नी (वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक, त्याची पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत असताना, त्याच्या मागील सीटवर बसलेल्या आरोपीला त्याने ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि ‘शांत बसा’ अशी विनंती केली. यामुळे चिडून आरोपीने अभिषेकची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि खाली पाडले. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. जेव्हा अभिषेकची पत्नी भांडण सोडवण्यासाठी पुढे आली, तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.


जुन्या भांडणातून तरुणांवर दगडफेक

जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (७ सप्टेंबर) रात्री बकाजी कॉर्नर, बावधन येथे घडली.

याप्रकरणी कार्तिक नंदकुमार दगडे (१९, बावधन) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईराज दगडे आणि विशाल भुंडे (बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि त्याचा मित्र हर्षल भुंडे अफरोज यांच्या सोबत घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. अफरोज भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना, विशाल भुंडेने रस्त्यावरील दगड उचलून कार्तिकच्या डोक्यात मारला. साईराज दगडेने हर्षलच्या उजव्या हातावर दगड मारून त्याला किरकोळ जखमी केले. त्यानंतर विशालने अफरोजच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.


टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन महिलांचा मृत्यू

 टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका १७ वर्षीय तरुणी आणि एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री भोसरी येथे गृहलक्ष्मी कॉलनीकडून सदगुरुनगर कमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

कादंबरी काशिनाथ गादेकर (१७) आणि प्रतिभा कृष्णा आंबटवार (३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी काशिनाथ पाडूरंग गादेकर (४१, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत सोपान वाडेकर (३६, शिरोली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत वाडेकर त्याच्या ताब्यात असलेला साऊंड सिस्टीम टेम्पो ( एमएच १४ एएस ५८२३) वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत होता. त्याने फिर्यादीची मुलगी कादंबरी आणि मेव्हण्याची पत्नी प्रतिभा आंबटवार यांना जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी न थांबता पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक

एका अनोळखी चारचाकी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिली. ही घटना शनिवारी (६ सप्टेंबर ) रात्री काळेवाडी फाटा ते रहाटणी फाटा या दरम्यान बीआरटीमध्ये घडली.

याप्रकरणी प्रमोद राजेंद्र माने (३६, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद त्यांच्या पत्नी सोबत दुचाकीवरून जात असताना, एका चारचाकी चालकाने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. यामुळे प्रमोद यांच्या डोळ्याखालील बाजूला, उजव्या हाताला आणि त्यांच्या पत्नीच्या उजव्या पायाला व उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तसेच, दुचाकीचे आणि मोबाईल व हातातील घड्याळाचे नुकसान झाले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.


गोवंश तस्करी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन जर्सी गायींची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी किवळे येथील समीर लॉन्सजवळ करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कदम यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद गजानन जाधव (३६, रहाटणी) आणि बाळा पवार (चांदखेड, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली की, एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असून त्यांना कत्तलखान्यात नेले जात आहे. त्यानुसार रावेत पोलिसांनी कारवाई करत एक टेम्पो पकडला. त्यातून ३० हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायींची सुटका केली. रावेत पोलीस तपास करत आहेत.


मिरवणुकीत डीजे लावणे गणेश मंडळांना भोवले;पाच मंडळांवर गुन्हे दाखल  

दत्तवाडी आकुर्डी येथे शिवाजी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत लेजर बीम आणि डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याने मंडळाचा अध्यक्ष सुरज मारुती पिंजण (दत्तवाडी, आकुर्डी), डीजे चालक मालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लेजर बीम आणि डीजे प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांच्या फिर्यादीवरून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये सुदर्शन मित्र मंडळ, सुदर्शननगर आकुर्डी या मंडळाचा अध्यक्ष आदित्य सुनील शिंदे, डीजे मालक क्षितिज शहा (श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि बीम लाईट मालक सिद्धांत गणेश यादव (कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळाच्या मिरवणुकीत बंटी गृपजवळ आवाजाची पातळी तपासण्यात आली होती. त्यावेळी डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले.

दिघी रोड भोसरी येथील अध्यक्ष प्रथमेश गोरख गवळी, उपाध्यक्ष आकाश गवळी असलेल्या मंडळाने डीजे लावून ध्वनी प्रदूषण केले. याप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह ट्रॅक्टर चालक हेमला चव्हाण, डीजे मालक अर्जुन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


Bhagwan Shinde: विद्यार्थ्यांनी जुनी व नवीन अध्ययन पद्धती आत्मसात करून अभ्यास करावा- रो.भगवान शिंदे

 Pune Airport : लँडिंग न झाल्याने पुणे विमानतळावर अर्धा तास विमान घालत होते घिरट्या, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

भोसरी मधील लोंढे आळी येथील मंडळाचा अध्यक्ष आर्यन विक्रम सपकाळ (२०, भोसरी), डीजे मालक प्रवीण विठ्ठल सावंत (३८), ट्रॅक्टर चालक मालक गोपाळ राठोड (४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतिश मरगळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश्य आवाजात डीजे वाजवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

भोसरी मधील शास्त्री चौक मंडळाचा अध्यक्ष स्वप्नील अशोक बुर्डे (२९, भोसरी), डीजे मालक दर्शन ओव्हाळ (३३), ट्रॅक्टर चालक मालक गोपाळ (४०, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अतिश मरगळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


Follow Us On