situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 08 August 2025 : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड

Published On:
Pimpri Chichwad Crime News 08 August 2025

Team My pune city – एका घरातून १ लाख २३ हजार रुपयांचा ( Pimpri Chichwad Crime News 08 August 2025) ऐवज चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) पहाटे आळंदी येथील ज्ञानदेवी नगर येथे घडली.

सचिन भीमराव बागल (२४, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमरसिंह रामभाऊ शेळके (२५, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याने फिर्यादी अमरसिंह यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून ८९ हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन, १८ हजार रुपयांचा इन्फिनिक्स हॉट ११ एस फोन आणि १६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी सचिन याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.


भांडण सोडवणाऱ्या तरुणाला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 08 August 2025)

अंडाभुर्जीच्या हातगाडी जवळ झोपलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (६ ऑगस्ट) रात्री चाकण येथील आंबेठाण चौकातील एच के अंडाभुर्जी हातगाडीवर घडली.

याप्रकरणी अविनाश विजय धोत्रे (१९, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण अशोक प्रधान (१९, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश हे आंबेठाण चौकातील एका अंडा भुर्जीच्या गाडीजवळ लोखंडी बाकड्यावर झोपले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर हाताने झापड मारली आणि डोक्यात फायबरच्या स्टूलने मारहाण करून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप


भरधाव बसने धडक दिल्याने पती-पत्नी जखमी ( Pimpri Chichwad Crime News 08 August 2025)

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव बसने धडक दिल्याने कारमधील पती-पत्नी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी लांडेवाडी भोसरी येथे घडली.

याप्रकरणी रामचंद्र बापू शिंदे (५२, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश सायलु कोरोमणी (६०, घोरपडी पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी त्यांच्या कारने (एमएच ४३/ए ९४९२) घरी जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस (एमएच ४३/एचओ ०४८४) भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली. यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


वाहनांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला जीवे मारण्याची धमकी ( Pimpri Chichwad Crime News 08 August 2025)

वाहनावर दंडात्मक कारवाई करत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला एका तरुणाने वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी देहू फाटा येथे घडली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कल्याण भोसले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इस्माईल सैफान भागानगरे (२३, भोसरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल कल्याण भोसले हे दिघी-आळंदी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते गुरुवारी सायंकाळी आळंदी येथील देहू फाटा येथे कर्तव्य बजावत होते. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना आरोपीने वाहनावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीने भोसले यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारहाण केली. यात भोसले यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळ दुखापत झाली. तसेच, आरोपीने भोसले यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार – अजित पवार


घरात गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल ( Pimpri Chichwad Crime News 08 August 2025)

घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी खंडेवस्ती, भोसरी येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब भांगले यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुगन स्वरुपराम चौधरी (३२, खंडेवस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याने लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल हे माहित असूनही पुरेसा बंदोबस्त न ठेवता घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरत होता. यावेळी त्याच्याकडून १७ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On