Team My Pune City –जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (५ सप्टेंबर) रात्री मोरवाडी कोर्टाजवळ घडली.
विजय बन्सीलाल कुर्मी (३५, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल उर्फ बजरंग संदीप जानराव (२०, अजमेरा, पिंपरी), सार्थक शंकर कागदे (१९, नेहरुनगर, पिंपरी), जावेद सलीम शेख (१७, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) आणि आसीफ उर्फ सिराजुदिन आल्लवद्दीन खान (२०, मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गटटू आणि काठीने मारहाण केली. तसेच, त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी साहिल, सार्थक आणि आसिफ या तिघांना अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
Nana Peth Crime News : कोमकरचा खून प्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा
Jambhavede: गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!
जातीच्या कारणावरून व्यवहारास नकार देत फसवणूक
पिंपरी परिसरात एका व्यक्तीने जमीन खरेदीच्या व्यवहाराच्या नावाखाली ३० लाख रुपये घेऊन फसवणूक केली आणि जातीवरून अपशब्द वापरून व्यवहार करण्यास नकार दिला. ही घटना २८ एप्रिल ते २७ मे २०२५ या कालावधीत पिंपरीतील ॲडव्होकेट पांडुरंग निंबाळकर यांच्या कार्यालय आणि रहाटणी येथील श्री रामनिवास तलाठी यांच्या कार्यालयाजवळ घडली.
याप्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन नवनाथ साळुंके (वडज, जुन्नर, पुणे), गणेश बाळू उर्फ बाळासाहेब शिंदे (रहाटणी, पुणे) आणि तीन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भागीदाराकडून जागा खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरीमध्ये विसार पावती तयार केली आणि ३० लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी खालच्या जातीचे असल्याचे सांगून आरोपींनी त्यांच्याशी केलेला व्यवहार दुसऱ्याच व्यक्तीशी केला आणि त्यांची फसवणूक केली. तसेच, ते खालच्या जातीचे असल्याचे कारण देत त्यांच्याशी व्यवहार करण्यास नकार दिला. याबाबत फसवणूक आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे तपास करीत आहेत.
मारहाण केल्याचा जाब विचारल्याने एकास मारहाण
भावाला मारहाण करणाऱ्यांना जाब विचारल्यामुळे एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडी फळीने मारून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (५ सप्टेंबर) रात्री शिवशक्ती कॉलनी, विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
अनिल अशोक काटे (४१, विजयनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम आदिवारेकर (२८, काळेवाडी) आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा भाऊ सुरेश काटे याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना, आरोपींनी त्यांना अडवले. फिर्यादींनी आरोपींना “माझ्या भावाला का मारले” असे विचारले असता, आरोपींनी अनिल यांच्या डोक्यात जोरात लाकडी फळी मारून त्यांना गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
निगडी परिसरात एका व्यक्तीला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (६ सप्टेंबर) रात्री ओटास्किम, निगडी येथे करण्यात आली.
प्रकाश उर्फ पक्या तुकाराम शिंगे (३५, ओटास्किम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल बाळू यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्किम निगडी येथे एकजण तलवार घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून प्रकाश शिंगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.