situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 05 September 2025: शासकीय नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी एकास अटक

Published On:

Team My Pune City –एका व्यक्तीने स्वतःला ग्रामसेवक भासवून शासकीय नोकरीचे आमिष दाखवत एका व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते जून २०२४ पर्यंत भोसरी येथील अंकुशराव नाट्यसभागृह येथे घडली.

राजेश राकेश पासवान (विजय चौक, गारखेड, छत्रपती संभाजी नगर)(Pimpri Chichwad Crime News 05 September 2025) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात दिपक मल्लिनाथ भोसले (३४, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी


Ganesh Visrajan : गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास करता येणार नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला ग्रामसेवक असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपीला एकूण २ लाख रुपये दिले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने भारत सरकारची राजमुद्रा असलेले खोटे नियुक्तीपत्रही दाखवले. मात्र, आरोपीने फिर्यादीला नोकरी दिली नाही आणि त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


व्यवसायात जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५३ लाखांची फसवणूक

आळंदी येथे एका व्यक्तीने एजंट असल्याची बतावणी करून एका निवृत्त व्यक्तीची ५३ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १८ नोव्हेंबर २०१६ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत आळंदी देवाची येथे घडली.

मनोज धोंडोपंत फरकंडे (३७, मरकळ रोड, पुणे) आणि बी.एम.ए. वेल्थ क्रिएटर्स लि., अल्पारी इंटरनॅशनल ट्रेडींग कंपनी, टी.पी. ग्लोबल आणि आय.एक्स. इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शामकांत एकनाथ भवरिया (६८, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून स्वतःला ‘बीएमए’ कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. त्याने फिर्यादीला त्यांच्या डिमॅट खात्यात गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा मिळेल असे सांगितले. फिर्यादीने आरोपीच्या सांगण्यावरून विविध कंपन्यांचे ५३ लाख २८ हजार २७ रुपयांचे शेअर्स खरेदी केले. मात्र, कंपनी बंद झाल्यानंतर आरोपीने गुंतवणुकीची रक्कम किंवा परतावा दिला नाही. आळंदी पोलीस तपास करत आहेत.


कॅबचालकाला मारहाण करत दिली धमकी

विप्रो सर्कलजवळ एका रिक्षाचालकाने कॅबचालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (४ सप्टेंबर) रात्री हिंजवडी येथे घडली.

या प्रकरणात अंकुश हरिचंद्र जाधव (३२, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेश पांडुरंग खाणेकर (२५, खांबोली, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीला “तू माझ्या गाडीला रिक्षा का धडकवलीस” असे विचारले. यावर चिडून रिक्षाचालकाने फिर्यादीला स्टीलच्या पट्टीने मनगटावर, पायाच्या मांडीवर आणि हातातील कड्याने डोक्यात मारून जखमी केले. तसेच “तुला बघून घेतो” अशी धमकी देत शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.


पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तोडफोड, १२ जणांवर गुन्हा दाखल

भोसरी येथे जुन्या भांडणातून १२ जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून तोडफोड केली. ही घटना बुधवारी (३ सप्टेंबर) रात्री खंडेवस्ती, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात सुरज जयसिंग जाधव (१८, खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक प्रशांत जावळे, ऋषिकेश विकास लष्करे, प्रितम सुधीर जावळे, देवांश उर्फ ईल्या, साहिल तुपसौंदर, शुभम उर्फ भुत्या शिंदे, अनुज कुमार, निखील कांबळे, अनुज जाधव, प्रेम शर्मा, प्रेम शिंदे आणि भुर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आरोपी ऋषिकेश लष्करे, साहिल तुपसौंदर, निखील कांबळे आणि प्रेम शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घराबाहेर थांबले असताना जुन्या भांडणातून काही आरोपी लोखंडी रॉड आणि काठ्या घेऊन आले. त्यांनी हवेत काठ्या फिरवून दहशत निर्माण केली आणि भांडण सोडवण्यासाठी जमलेल्या लोकांना धमकावले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून सामान अस्ताव्यस्त केले. घराबाहेर पडल्यानंतर काही आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत धमकी दिली. काही आरोपींनी फिर्यादीची दुचाकी आणि दोन रिक्षांची तोडफोड करून नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.


शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी येथील डिलक्स चौकजवळ एका व्यक्तीला सार्वजनिक रोडवर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (४ सप्टेंबर) पहाटे घडली.

अजय उदय सिंग उर्फ जिमी (३०, डिलक्स चौक, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रविण शेळके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विनापरवाना एक लोखंडी कोयता जवळ बाळगला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत अजय याला अटक केली. त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


अपशब्द वापरल्याने एकावर प्राणघातक हल्ला

काळेवाडी येथे तरुणीबद्दल अपशब्द वापरल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (३ सप्टेंबर) दुपारी काळेवाडी येथे घडली.

रवी किशोर रवानी (४०, काळेवाडी), रोहित गायकवाड (३०, शास्त्रीनगर), अल्ताफ मेहबूब शेख (२१, काळेवाडी) आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रवी, रोहित आणि अल्ताफ यांना अटक केली आहे. याबाबत सचिन दिलीप नाईकनवरे (३८, काळेवाडी फाटा) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याने फिर्यादीला “तू माझ्या मुलीबद्दल अपशब्द वापरले” असे विचारून मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. आरोपी रवीने “आज याला संपवायचे आहे” असे म्हणताच एका महिलेने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. इतर आरोपींनीही लोखंडी कड्याने आणि दगडाने फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादीला रुग्णालयात दाखल केले असतानाही आरोपींनी तिथे येऊन पुन्हा मारहाण केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On