Pimpri Chichwad Crime News 05 May 2025 : शेअर मार्केटच्‍या नावाखाली २० लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri Chichwad Crime News 05 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – एका व्‍यक्‍तीची ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल २० लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ३१ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ या दरम्यान मुळशी तालुक्‍यातील सुस येथे ( Pimpri Chichwad Crime News 05 May 2025) घडला.

याप्रकरणी फेज-२ सूस येथे राहणार्‍या ४५ वर्षीय व्‍यक्‍तीने रविवारी (४ मे) याबाबत बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार पोलिसांनी विविध मोबाइल धारक, बँक खातेधारक यांच्‍यासह नऊ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तींनी दोन लिंक पाठवून एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून फसवणूक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली खाती आरबीएल व इंडसइंड बँकेतील विविध नावांनी आहेत.

Pune: महाराष्ट्रातील १०३ दिव्यांगांना ‘दगडूशेठ’ च्या वतीने कृत्रिम अवयव


दुचाकीचा धक्‍का लागल्‍याने तिघांना मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 05 May 2025)

दुचाकीचा धक्‍का लागल्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या भांडणात सहा जणांनी मिळून तिघांना मारहाण केली. तसेच एका तरुणाच्‍या डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार ३ मे २०२५ रोजी रात्री १० वाजता डिलक्स चौक, पिंपरी येथे घडला आहे.

याबाबत २५ वर्षीय महिलेने रविवारी (४ मे) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिलांसह ओंकार पवार, रोहन वाघमारे, बाबु डावरे आणि तुषार भोगील यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी महिला यांचा भाऊ विक्‍की हा पिंपरीतील डिलक्‍स चौक येथे असलेल्‍या कटारे मामीच्‍या दुकानासमोर दुचाकी पार्क करत असताना महिला आरोपीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी फिर्यादी व तिच्या भावास शिवीगाळ व मारहाण झाली. आरोपी ओंकार पवार ओंकार पवार याने अन्य आरोपींना बोलावले आणि त्यांनी मिळून विक्की, मनोज, रोशन यांना मारहाण केली. मनोजच्या डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी करण्यात आले.


खासगी आराम बसची दुचाकीला धडक ( Pimpri Chichwad Crime News 05 May 2025)

भरधाव वेगातील खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकजण जखमी झाला. ही घटना मुंबई–सातारा हायवेवरील महिंद्रा लाईफस्पेस सोसायटीसमोर शनिवारी (३ मे) दुपारी तीन वाजताच्‍या सुमारास घडली.

रवि मुरलीधर राऊत (३९, मुकाई चौक, रावेत) असे जखमी झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव असून त्‍यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच ४३/बीजी ५८०३) या खासगी आराम बसवरील कैसरअली शेख (३५, गोवंडी, मुंबई) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २.५५ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी रवि राऊत हे आपल्‍या दुचाकीवरून मुंबई सातारा महामार्गावरून चालले होते. ते महिंद्रा स्‍पेस सोसायटीसमोर आले असता त्‍यांच्‍या दुचाकीला भरधाव वेगातील खासगी आराम बसने धडक दिली. या अपघातात राऊत हे जखमी झाले. त्‍यांना आरोपी कैसरअली  शेख याने त्‍याच्‍या बसमधून रुग्‍णालयात उपचारासाठी नेऊन दाखल केले.


गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्‍हा ( Pimpri Chichwad Crime News 05 May 2025)

एका महिलेकडून गांजा जप्त करून तिच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (४ मे) दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास वाकडमधील म्‍हातोबानगर झोपडपट्‌टी येथे करण्‍यात आली.

याबाबत पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखा युनिट क्रमांक चारमधील पोलीस अंमलदार धनाजी रामचंद्र शिंदे (३९) यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाकड येथे राहणार्‍या ३८ वर्षीय महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, महिला आरोपी हिने म्हातोबा नगर, झोपडपट्टीसमोर, दत्तमंदिर रोड येथे बेकायदेशीरपणे ११ हजार ६०० रुपये किमतीचा २३२ ग्रॅम गांजा बाळगल्याचे आढळून आले. त्‍यानुसार तिच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

Talegaon Dabhade : हभप  सोपानराव भोंगाडे यांचे निधन


बेकायदेशीर गॅस रिफिलींग प्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल ( Pimpri Chichwad Crime News 05 May 2025)

बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग करणाऱ्या एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुळशी तालुक्‍यातील महाळुंगे पाडाळे येथे रविवारी (४ मे) दुपारी सव्‍वाबारा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार विजय रंगनाथ नलगे (४०) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार अविनाश दत्तात्रय माने (२५, महाळुंगे, पुणे) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आर्य गॅस एजन्सी, गोदरेज हिलसाइड २ सोसायटीजवळ आरोपी अविनाश माने बेकायदेशीररित्या गॅस सिलिंडरमधून छोट्या टाक्यांमध्ये रिफिलींग करताना पोलिसांना आढळून आला. त्याच्या कडून ४९ हजार १०० रुपयांचा अवैध गॅस साठा व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Follow Us On