Team My Pune City – मोबाईल परत घेतल्याच्या रागातून दोघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 04 September 2025) केली. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.
या प्रकरणी शंकर मारुती दारसेवाड (३४, निघोजे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप देवराव राठोड (४१, निघोजे) आणि सोन्या उर्फ अभिषेक गणपत जगताप (२४, निघोजे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर यांच्या रुमच्या मागे भांडणाचा आवाज येत होता. फिर्यादी तिथे गेले असता आरोपी दिलीप याने फिर्यादीचा मोबाईल घेतला होता. तो फिर्यादीने परत घेतल्याच्या रागातून दोन्ही आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. आरोपी दिलीप याने हाताने लाथाबुक्क्यांनी मारले, तर आरोपी सोन्या याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या कानाजवळ मारून जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी शेजारी राहणारा सुरेश कार्तिक राय आला असता आरोपींनी त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये राडा;परस्पर विरोधात गुन्हे दाखल ( Pimpri Chichwad Crime News 04 September 2025)
गणेश विसर्जन मिरवणुकीत पुढे जाण्याच्या कारणावरून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण करून जनरेटर आणि टेम्पोचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री १० वाजताच्या सुमारास चिखली येथील वंदे मातरम चौक, रुपीनगर येथे घडली. याप्रकरणी दोन्ही मंडळातील २० कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दक्षता तरुण मंडळाचे कुणाल रघुनाथ पाटील (३२, तळवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीमंत तिरंगा मंडळाचे कार्यकर्ते राहुल पवार, रोहन पाटील, अनुज देशमुख, करण फिरके, योगेश गुजर, महेश कदम, नितीन चौधरी आणि राहुल जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरवणूक सुरु असताना आरोपींनी त्यांच्या मंडळाची मिरवणूक पुढे घेण्यावरून वाद घातला. त्यांनी फिर्यादीच्या मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली. तसेच, महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली मानवी साखळी तोडून आरोपींनी मंडळाच्या जनरेटर ठेवलेल्या छोट्या टेम्पोच्या पुढील काचेवर बुक्की मारून तोडफोड केली.
याच्या परस्पर विरोधात श्रीमंत तिरंगा मंडळाचे राहुल अशोक पवार (४४, तळवडे) यांच्या फिर्यादीवरून अक्षय गरुड, मिलिंद काजळे, तन्मय कदम, कुणाल पाटील, तुषार काजळे, संतोष डावरे, सुनिल ईश्वराज शर्मा, तुषार किशोर कुकरेजा, गोकुळ कदम, विनोद इंगळे, शुभम सदानंद आणि केतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश विसर्जन मिरवणुकीत पुढे जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
NIPM : एनआयपीएमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पुण्यातील तीन जणांची निवड
वाहन थांबवण्याचा इशारा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला उडवले ( Pimpri Chichwad Crime News 04 September 2025)
नियमांचे उल्लंघन करत बीआरटी मार्गातून जाणाऱ्या दुचाकी चालकाला थांबण्याचा इशारा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला धडक देऊन जखमी केले. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) दुपारी नाशिक फाटा ओव्हरब्रिजवरील बीआरटी मार्गावर घडली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विलास केकान यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १२/एलबी ४९९०) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केकान हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते मंगळवारी दुपारी नाशिक फाटा ओव्हरब्रिजवर वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी एक दुचाकी बीआरटी लाईनमधून आली. बीआरटी मार्गात खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने त्या वाहनाला थांबण्याचा केकान यांनी इशारा केला. मात्र आरोपी दुचाकी चालक न थांबता त्याने केकान यांना धडक दिली आणि पळून गेला. दरम्यान या अपघातात केकान यांच्याकडील सरकारी ई चलन मशीन रस्त्यावर पडल्याने तिचे नुकसान झाले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक ( Pimpri Chichwad Crime News 04 September 2025)
पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला एक आरोपी पिस्तूल आणि काडतुसे बाळगताना पोलिसांना आढळला. ही कारवाई बुधवारी (३ सप्टेंबर) दुपारी पिंपळे गुरव येथे महाराजा हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत करण्यात आली.
व्यंकटेश राजेंद्र भोसले (३३, पिंपळे गुरव) या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आशिष बनकर यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यंकटेश भोसले याला डिसेंबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ३१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.