Team My pune city – अवैधरित्या गॅस रिफिलिंग केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (३ जुलै) खेड तालुक्यातील चिंबळी येथे सर्वेश गॅस एजन्सी या दुकानात करण्यात ( Pimpri Chichwad Crime News 04 July 2025)आली.
सचिन एकनाथ नरवडे (३७, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप गोडांबे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नरवडे याचे चिंबळी गावात सर्वेश गॅस एजन्सी हे दुकान आहे. त्याने त्याच्या दुकानामध्ये घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग केला. गॅस चोरी करत असताना त्याने सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही. तसेच गॅस रिफील करण्याचा त्याच्याकडे कोणताही परवाना नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सर्वेश गॅस एजन्सी मध्ये कारवाई करून ७० हजरांचा गॅस साठा आणि इतर साहित्य जप्त केले.
Pune Crime News : पुणे तिथे काय उणे, कारवाई होणारा ही मद्यधुंद आणि कारवाई करणारा ही मद्यधुंद
रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने एकास मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 04 July 2025)
रस्त्यात थांबवलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने रिक्षा चालकाने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना बुधवारी (२ जुलै) सायंकाळी रामनगर, रहाटणी येथे घडली.
भारत सुभाषचंद्र पंजाबी (४४, धायरी, पुणे) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित संजय लोणारे (२७, रहाटणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत हे रहाटणी येथून दुचाकीवरून जात होते. भालेराव कॉलनीतून जात असताना आरोपीने त्याची रिक्षा रस्त्यात थांबवली होती. दुचाकी जाण्यासाठी देखील जागा नसल्याने भारत यांनी आरोपीला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. आजूबाजूच्या लोकांनी देखील रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने भारत यांना शिवीगाळ केली. त्याच्या तीन साथीदारांना बोलावून भारत यांना मारहाण केली. आम्ही इथले भाई आहोत. इथे कोणतेच पोलीस येत नाहीत, असे म्हणत धमकी दिली.
Murder : ठाकरसाई येथे डोक्यात कुदळ घालून सहकारी कामगाराचा खून
सोन्याची चेन चोरल्याचा संशयावरून तरुणाला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 04 July 2025)
सोन्याची चेन चोरल्याचा संशयावरून दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (३ जुलै) रात्री खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.
काशिनाथ रंगनाथ भक्त (२५, निघोजे, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दर्शन लक्ष्मण शिंदे, चैतन्य ज्ञानेश्वर येळवंडे (निघोजे, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बेंडाले याने आरोपी दर्भन याला सोन्याची चेन घालण्यासाठी दिली होती. ती चेन फिर्यादी काशिनाथ यांनी चोरल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपींनी काठीने काशिनाथ यांना मारहाण करत जखमी केले.
मनी लॉन्डरिंग गुन्ह्याची भीती दाखवत महिलेची सात लाखांची फसवणूक ( Pimpri Chichwad Crime News 04 July 2025)
महिलेच्या आधार कार्डचा मनी लॉन्डरिंगसाठी वापर झाला असून त्याबाबत अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल झाल्याचे अज्ञातांनी सांगितले. गुन्ह्यातून सुटका करून घेण्यासाठी सांगितलेली प्रोसेस पूर्ण करा म्हणत महिलेची सात लाख २७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना २१ जून ते २४ जून रोजी साने चौक, चिखली येथे घडली.
याप्रकरणी चिखली येथील ४४ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी महिलेशी फोनद्वारे संपर्क केला. फोनवरील व्यक्तींनी ते आधार विभागातून बोलत असल्याचे सांगून महिलेला तिचा आधार क्रमांक एका मनी लॉन्डरिंग प्रकरणात वापरला गेला असून त्याबाबतर अंधेरी पोलीस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा पाठवण्यात आला आहे. तिथून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घेऊन ते आधार विभागात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर एका क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले. त्या क्रमांकावरील व्यक्तीने फिर्यादी महिलेची बँक खात्याची, कागदपत्रांची माहिती घेतली. बँकेतील जमा रक्कम आरबीआयला पाठवावी लागेल, असे सांगून महिलेला चार लाख ८७ हजार ५०० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या कागदपत्रांच्या आधारे पर्सनल लोन घेऊन दोन लाख ४० हजार रुपये आरोपींनी त्यांच्या खात्यावर घेतले. महिलेने आरोपींना एकूण सात लाख २७ हजार ५०० रुपये पाठवले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला.