situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 04 August 2025 : कटरने वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला

Published On:
Pimpri Chichwad Crime News 04 August 2025

Team My pune city – लोखंडी कटरने वार करत एकाने दोघांना ( Pimpri Chichwad Crime News 04 August 2025)गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात ऋषिकेश शदर कुबल (३८, मांजरी, हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल बबन घोलप (५०, चऱ्होली आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश आणि त्यांचा भाऊ राहुल हे एका फ्लॅटमध्ये साफसफाईचे काम करत होते. त्यावेळी आरोपी अनिल हा तिथे आला. त्याने शिवीगाळ करत “माझे हात उसने घेतलेले पैसे कधी देतो” असे विचारले. त्यानंतर त्याने “तुला आता जिवंत सोडत नाही” असे म्हणत ऋषिकेश यांच्या गळ्यावर लोखंडी कटरने वार केला. त्यानंतर अनिलने इमारतीखाली असलेल्या गणेश मंदिराजवळ जाऊन राहुल यांच्या उजव्या गालावर लोखंडी कटरने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


महिलेसोबत बोलण्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने वार ( Pimpri Chichwad Crime News 04 August 2025)

महिलेसोबत बोलल्याच्या कारणावरून वाद घालून एकाने तरुणावर चाकूने हल्ला केला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी दुपारी नखातेनगर, थेरगाव येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिलीप हुलराम सुर्यवंशी (२४, थेरगांव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सेलवराज अंहंडी थेवर (५१, थेरगांव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप आणि आरोपी सेलवराज गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्यादी हे मुरगम्मा या महिलेशी बोलत होते. दिलीप हे महिलेला बोलत असल्याचा राग आरोपीला आला. त्याने दिलीप यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हातावर आणि उजव्या हाताच्या पोटरीवर वार केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Anna Bhau Sathe : साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात रंगला दिंडी, लोकनृत्य व मराठी गीतांचा ऐतिहासिक सोहळा


खोट्या सोन्याच्या अंगठ्या देऊन फसवणुकीचा प्रयत्न ( Pimpri Chichwad Crime News 04 August 2025)

खोट्या सोन्याच्या अंगठ्या बँकेत गहाण ठेवून गोल्ड लोन मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) रोजी दुपारी तिरुमाला तिरुपती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चाकण शाखेत घडली.

याबाबत रोहित मिलिंद थोरात (२७, रासे, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. जब्बार करीम शेख (४०, थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जब्बार याने चाकण येथील तिरुमाला तिरुपती मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी मधून गोल्ड लोन घेतले. हे कर्ज घेत असताना त्याने १९.५२० ग्रॅम वजनाच्या दोन खोट्या सोन्याच्या अंगठ्या घेऊन सोसायटी कडून १ लाख २० हजार रुपयांचे गोल्ड लोन मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासणी मध्ये हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करत आहेत.


घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा कारच्या धडकेत मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 04 August 2025)

घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या मुलीला कारने धडक दिली. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शिवराजगनर रहाटणी येथे घडली.

सुकन्या शिवराज देवरे (२) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत शिवराज जळबा देवरे (२४, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जय योगेशकुमार लाठीवाला (शिवराजनगर, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी सुकन्या शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी जय याने त्याची कार (एमएच १४/एलवाय ६२०१) निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून सुकन्याला धडक दिली. या अपघातात सुकन्या गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Maval Crime News : जांभूळगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये हाणामारी परस्परविरोधी गुन्हा दाखल


सोसायटीच्या पार्किंगमधून सायकल चोरी

सोसायटीच्या पार्किंगमधून एका अज्ञात व्यक्तीने १६ हजार ८७५ रुपये किमतीची स्पोर्टस् कंपनीची गियरची सायकल चोरली. ही घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी सहा ते रात्री नऊच्या दरम्यान नवकार ऑरकिड, श्रीधनरनगर, चिंचवड येथील सोसायटीच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घडली.

याबाबत संकेत माधव झानपुरे (४५, श्रीधनरनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष राजू मोरे (३५, बौद्धनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाची १६ हजार ८७५ रुपये किमतीची सायकल सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली होती. आरोपी संतोष याने ती सायकल चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.


आमदाराचा पुतण्या असल्याचे सांगून वाहतूक पोलिसांशी हुज्जत ( Pimpri Chichwad Crime News 04 August 2025)

‘मी आमदाराचा पुतण्या आहे’ असे सांगत एका वाहनचालकाने ‘नो एन्ट्री’ मध्ये जाण्याचा हट्ट धरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माणिक चौक, चाकण येथे घडली.

या प्रकरणात पोलीस हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फॉर्च्यूनर (एमएच १४/एमके ९७९७) गाडीचा चालक मयुर काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माणिक चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील फॉर्च्यूनर गाडी ‘नो एन्ट्री’ असलेल्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्ससमोर उभी केली. “मी आमदाराचा पुतण्या मयुर काळे आहे. मी येथूनच जाणार” असे म्हणत त्याने नो एन्ट्रीतून जाण्याचा हट्ट धरला. त्याने मोठ्याने ओरडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि फिर्यादीसह इतर पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच, त्याने अपशब्द वापरून शिवीगाळ केली आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. चाकण पोलीस तपास करत आहेत.


दुचाकीला धडक दिल्याच्या संशयावरून पीएमपी बस चालक, वाहकाला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 04 August 2025)

स्वत:ची दुचाकी स्लिप होऊन पडलेल्या दुचाकीवरील दोघांनी पीएमपी बसने धक्का दिल्याचा संशय घेत बस चालक आणि वाहकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) रात्री आठ वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.

या प्रकरणात विकास सुर्यभान अकोलकर (३५, म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन कांबळे आणि आकाश गायकवाड (दोघेही, म्हाळुंगे, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास हे पीएमपी मध्ये वाहक म्हणून काम करतात. त्यांचे सहकारी बस चालक हिमशिल जोहरे यांच्यासोबत विकास हे पीएमपी बस म्हाळुंगे येथून पुणे येथे जात होते. म्हाळुंगे येथील ग्रीन हिल सोसायटी समोर आरोपी त्यांच्या दुचाकीवरून स्लिप होऊन पडले. मात्र आपल्या दुचाकीला बसने धडक दिल्याचा त्यांचा समज झाला. त्यातून त्यांनी फिर्यादी विकास आणि चालक हिमशिल यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On