situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime 24 June 2025 : मारहाण प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल

Published On:
Pimpri Chichwad Crime 24 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – गाडी पार्क करण्‍यासाठी खंडणी न दिल्याने क्रेटा व स्कॉर्पिओ गाडी फोडून वाहनधारकासह तिघांना मारहाण करण्यात (Pimpri Chichwad Crime 24 June 2025)आली. ही घटना २१ जून ते २२ जून या कालावधीत खेड तालुक्यातील बापदेव वस्ती, कडाचीवाडी येथे घडली. या प्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेश बबन कड (३२, कडाचीवाडी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. आनंद लक्ष्मण कड (३२, कडाचीवाडी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी कड यांनी त्यांची स्कॉर्पिओ कार (एमएच१४/ एफजी ६७११) कडाचीवाडी येथील जय हनुमान मंदिराजवळ पार्क केली होती. आरोपीने पार्किंगसाठी कड यांच्याकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. कड यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने स्कॉर्पिओची तोडफोड केली. तसेच मित्र भूषण खांडेभराड यांनाही मारहाण करत धमकी दिली. कड हे तक्रार देण्‍यासाठी पोलीस ठाण्‍यात आले असता त्‍यांच्‍या घरासमोरील क्रेटा गाडी फोडून कड यांच्या भावाला मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात बबन दादाभाऊ कड (७४, कडाचीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण खांडेभराड व आनंद लक्ष्मण कड (दोघेही रा. कडाचीवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बबन कड यांचा मुलगा महेश याला आरोपींनी शिवीगाळ करून खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या फिर्यादी व त्यांच्या सुनेलाही मारहाण करून धमकी देण्यात आली.

Thergaon Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या बोटांसह तोडला हाताचा पंजा; तिघांना अटक


काळेवाडीतील महिलेची ५९ हजारांची फसवणूक (Pimpri Chichwad Crime 24 June 2025)

ऑनलाइन बांगड्या परत करताना गुगलवर दिलेल्‍या नंबरवर संपर्क केला असता चोरट्याने एका महिलेची ५९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२५ दरम्‍यान काळेवाडी येथे घडली.

९६९२४९२५६६, ७२६८८३२९१४ या मोबाइल नंबरवरील अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत काळेवाडी येथील एका महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मिशो अ‍ॅपवर खरेदी केलेल्या बांगड्या परत करण्यासाठी गुगलवर कस्‍टमर केअरचा शोध घेतला असता बोगस क्रमांक मिळाले. त्या नंबरवरून फिर्यादी यांना Google Pay द्वारे ५९ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली.

Maval Crime News: पोलिसांना माहिती दिल्याने एकास मारहाण


बांधकामाच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण (Pimpri Chichwad Crime 24 June 2025)

बांधकामाच्या वादातून शेजाऱ्याने घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना २२ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चिखलीतील ताम्हणेवस्ती भागात घडली.

गणेश एकनाथ लोकरे (चिखली) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. अनिल रंगनाथ सालगुडे (५२, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीच्‍या वडिलांशी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात लोखंडी गज मारून दुखापत केली.


कारच्‍या धडकेत दुचाकीस्वारास गंभीर जखमी (Pimpri Chichwad Crime 24 June 2025)

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या कानाला, खांद्याला, पायाला, मणक्याला फ्रॅक्चर झाले. हा अपघात रविवारी (२२ जून) सायंकाळी निगडी येथील आशापुरा हॉटेलसमोर झाला.

संजय शामसुंदर मिस्तरी (४८, निगडी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या कार चालकाचे नाव आहे. साईप्रसाद बालाजी मुंढे (२५, कासारवाडी) असे जखमी झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. त्‍यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी साईप्रसाद हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच २२/एवाय ७१३२) निगडी येथे जात होते. आशापुरा हॉटेल समोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका कारने (एमएच १४/एएम ४३९३) उजव्या बाजूने धडक दिली. आरोपीने वाहतुकीचे नियम पाळले नाहीत. या अपघातात फिर्यादीला डावा कान, खांदा, पाय व पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला.

Follow Us On