situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025 : बस थांबवत नसल्याने चालकाला मारहाण

Published On:
Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025

Team My pune city – बस थांबवत नसल्याने तिघांनी मिळून पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (३० जुलै) रात्री ( Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025) नऊ वाजता हिंजवडी-माण रोडवर घडली.

भागवत उत्तम त्रिंबके (२५), दिगंबर कुंडलिक त्रिंबके (५२) आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकास दयाकर गायकवाड (४३) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे पीएमपीएमएल मध्ये चालक म्हणून काम करतात. ते हिंजवडी-माण रोडने कामासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ते हिंजवडी-माण रोडवर बस थांबवत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना आणि त्यांचे सहकारी लक्ष्मण साबळे यांना मारहाण करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Accident : डंपर खाली चिरडून वृद्धाचा मृत्यू


टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू ( Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025)

आयशर टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (३० जुलै) सकाळी मारुंजी रोडवर घडली.

विद्या काळुराम जाधव (४७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी काळुराम गुलाब जाधव (५२, मेमाणेवस्ती, नेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक प्रवेश यादव (२५, वापी, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे त्यांच्या पत्नी विद्या यांच्यासोबत अॅक्टिव्हा गाडीने जात होते. आरोपीने त्याचा आयशर टेम्पो (जीजे १५/एव्ही २३१३) भरधाव वेगाने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादी गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या पत्नीच्या कमरेवरून चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.


अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ( Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025)

पुणे-नाशिक रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (३१ जुलै) रात्री तळेगाव चौकाजवळ, चाकण येथे घडली.

करण धर्मराज वानखेडे (२३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिध्देश्वर शिवाजी वानखेडे (३५, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ करण वानखेडे हा त्याच्या दुचाकी वरून पुणे-नाशिक रोडने जात होता. तळेगाव चौकाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात करण याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी


गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक ( Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025)

गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. तिच्याकडून ३८२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (३१ जुलै) दुपारी ओटास्किम निगडी येथे करण्यात आली.

ओटास्कीम निगडी येथील ४७ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम निगडी येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या ताब्यातून १९ हजार ८१० रुपये किमतीचा ३८२ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच काही रोख रक्कम जप्त केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.


शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ( Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025)

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (३१ जुलै) रात्री चाकण बस स्टँडजवळ करण्यात आली.

संतोष मच्छिंद्र टोपे (२८, वाकी बु, खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष टोपे याने त्याच्या ताब्यात एक कोयता बेकायदेशीरपणे बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.


जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना मारहाण ( Pimpri Chcihwad Crime News 01 August 2025)

जुन्या भांडणाच्या कारणावरून पती-पत्नीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (३१ जुलै) रात्री काळेवाडी येथील श्रीकृष्ण कॉलनीमध्ये घडली.

गौडाप्पा हनुमंतराय पाटील (३९, कोकणेनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मल्लिनाथ विजयकुमार पाटील (कोकणेनगर, काळेवाडी) आणि सुनील इरन्ना पाटील (घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या घरासमोर येऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी मल्लिनाथ याने लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On