Team MyPuneCity – पिंपरी मध्ये एका व्यवसायिकावर गोळीबार झाला. ही घटना (Pimpri)शुक्रवारी (1 ऑगस्ट) दुपारी घडली. भावेश काकराणी (20, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपरी गावात गेलहार्ड चौकाजवळ ओमकार जनरल स्टोअर्स या दुकानाच्या बाहेर भावेश बसला होता. त्यावेळी दुचाकीवरून एकजण तिथे आला. त्याने भावेशच्या गळयातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. चोरी करणाऱ्या व्यक्तीला भावेश याने विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत भावेश याच्यावर गोळीबार करण्यात आला. भावेशच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला पिंपळे सौदागर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ganesh Festival : गणेशोत्सवावरील वेळेची बंधने शिथिल होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडू – अजित पवार
Black Magic : तळेगाव दाभाडे येथे जादूटोणा केल्याचा प्रकार उघड

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी पोहोचले आहे. लुटमारीचे प्रकरण दिसत असले तरीही यामध्ये विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.