Team MyPuneCity – घरगुती वादातून भांडण उफाळून येत एका व्यक्तीवर लाकडी काठी व सिमेंट ब्लॉकने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना पिंपरीतील विठ्ठलनगर परिसरात घडली. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ही घटना ६ जून २०२५ रोजी रात्री १० वाजून ११ मिनिटांनी विठ्ठलनगर येथील इमारत क्रमांक २ मध्ये घडली. उमर लालला पठाण (वय ४५), रा. विठ्ठलनगर इमारत क्रमांक २, रुम क्रमांक २०८, पिंपरी यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
PCMC: चऱ्होलीकरांचा 9 जूनला महापालिकेवर मोर्चा
त्यांच्या तक्रारीनुसार, यापूर्वी त्यांची वहिनी व कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला होता. त्यांच्या आई-वडिलांना बोलवण्यासाठी ते त्यांच्या बहिणीकडे गेले असता, पुन्हा वाद झाला. यावेळी त्यांच्या वहिनीने (आरोपी क्र. १, वय ४९) त्यांच्या पाठीवर लाकडी काठीने मारहाण केली. त्यांचे बहिणीचे पती (आरोपी क्र. २, वय ५८) यांनी त्यांना पकडून ठेवले आणि मुलगा अमजद अमीन पठाण (वय २९) याने त्यांच्या नाकावर सिमेंटचा ब्लॉक फेकला. या हल्ल्यात उमर पठाण यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव झाला.
या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.