Team MyPuneCity – पोहणे, धावणे आणि सायकल चालविणे अशा तीनही स्पर्धामध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी “आयर्न मॅन” ही जगभरात लौकिक आहे. ४ किलोमीटर पोहणं, ४२ किमी धावणं आणि १८० किलोमीटर सायकल चालवणं अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक स्पर्धा वेळेत पूर्ण करत पिंपरी चिंचवड येथील अक्षय कुलकर्णी यांना आयर्न मॅन किताब मिळविण्यात यश आले आहे.
हॅम्बर्ग जर्मनी येथे ही स्पर्धा नुकतीच पार पडली. अनेक व्यक्तींसाठी ही स्पर्धा एक मोठे आव्हान असते. मात्र, अक्षय कुलकर्णी यांनी ही स्पर्धा यशस्वी पार केली. भारतीय हवामान व जर्मनीमधील वातावरण यात खूप फरक असल्याने सुरुवातीपासून स्पर्धा वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
PCMC Election : पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ प्रभागांमध्ये होणार १२८ नगरसेवकांची निवड
त्यात भाषा व आहारामुळे देखील अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र, निर्धारित वेळेतच ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्पर्धेत उतरलो होतो आणि ते यश मला माझ्या जिद्द आणि परिश्रमातून मिळाले असल्याचे अक्षय यांनी सांगितले.