Team My Pune – पिंपरी येथील शगुन चौकामध्ये रोडवर भांडणे(Pimpri) सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवार (दि.17 जुलै) रोजी रात्री घडली.
या प्रकरणात पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इरफान आरिफ शेख (वय 18, रमाबाई नगर, पिंपरी, पुणे), जयेश संजय घोंगडे (वय 18, रमाबाई नगर, पिंपरी, पुणे) आणि दोन विधीसंघर्षित बालकांसह त्यांचे दोन ते तीन अनोळखी मित्र असे आरोपी ताब्यात आहेत.
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Dhol Tasha Pathak : मैदानावर ढोल – ताशा पथकाला सरावाला परवानगी नाही – आयुक्त नवल किशोर राम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका अनोळखी व्यक्ती व महिलेची भांडणे सोडवण्यासाठी गेले असताना, तिथून रस्त्याने दुचाकीवर जाणारे आरोपी आणि त्यांचे अनोळखी मित्र यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादीच्या दुकानाच्या शेजारील दुकानातले आशिक शेख व सादिक शेख यांना पायावर, हाताच्या कोपऱ्याला व छातीवर छत्री अडकवण्याच्या लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.