situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimple Saudagar : सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीत ५५ किलोवॉट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

Published On:
Pimple Saudagar

पर्यावरणपूरक उपक्रमांतून उभारला नागरी सहभागाचा आदर्श

Team MyPuneCity – वाढत्या विजेच्या वापरावर उपाय आणि पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल टाकत पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीने ५५ किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन काल (रविवारी) केले. या हरित उपक्रमाने संपूर्ण परिसरात एक सकारात्मक उदाहरण उभे केले आहे.

या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे (Pimple Saudagar) यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी सोसायटीचे अनेक रहिवासी, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pimple Saudagar

यावेळी बोलताना नाना काटे म्हणाले, “सौरऊर्जा ही केवळ पर्याय राहिलेली नसून काळाची गरज बनली आहे. सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीसारख्या गृहसंस्थांनी घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणा देणारा आहे. हरित ऊर्जेकडे वळणे म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजाची बांधिलकी दर्शविणे.”

८० हजार युनिट्स वार्षिक निर्मितीची अपेक्षा

या ५५ किलोवॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरमहा सुमारे ६,६०० ते ७,००० युनिट्स आणि वार्षिक सुमारे ८०,००० युनिट्स वीज निर्मिती होईल, असा अंदाज आहे. परिणामी सोसायटीच्या विजेच्या खर्चात मोठी बचत होणार असून, पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट होईल.

Walhekarwadi Suicide : तरुण अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीत चेअरमन प्रवीण मंत्री (Pimple Saudagar), सचिव निखिल सैनी, कोषाध्यक्ष व्हिन्सेंट जॉन तसेच व्यवस्थापन समिती सदस्य शशांक बोकाडे, सतीश कुमार सूर्यवंशी, संतोष पांडा, संजय श्रीवास, सुधाकर पानसरे, मंदार शास्त्री, मनोज गोसावी आणि सोसायटी व्यवस्थापक संदीप क्षीरसागर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या सर्वांनी एकत्र येत नियोजन, खर्च व्यवस्थापन, तांत्रिक सल्ला आणि कार्यवाही यावर एकसंध पद्धतीने काम केल्यामुळे प्रकल्प वेळेत आणि गुणवत्ता राखून पूर्ण होऊ शकला.

सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीचा (Pimple Saudagar) हा प्रकल्प केवळ वीजबचतीपुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि शाश्वत पर्यावरणाची बांधिलकी दर्शवतो. नागरी भागीदारीतून उभा राहिलेला हा सौर प्रकल्प म्हणजे समाजाचे पर्यावरण रक्षणातील सक्रीय योगदान आहे.

सौरऊर्जेचा वापर करून सोसायटीने एक सामाजिक भान दाखवले असून, पर्यावरण पूरक जीवनशैली ही आता प्रत्येकाच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dehu : देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी

इतर सोसायट्यांसाठी आदर्श

पिंपरी-चिंचवडसारख्या नागरीकरण वेगाने होत असलेल्या शहरात विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीने (Pimple Saudagar) घेतलेला पुढाकार इतर गृहसंस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

राज्य व केंद्र सरकारच्या सौर प्रोत्साहन योजनांचा लाभ घेऊन अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये इतरांनीही सहभागी होणे आवश्यक आहे. त्यातून केवळ आर्थिक फायदा नव्हे तर दीर्घकालीन पर्यावरणीय लाभही सुनिश्चित होईल.

सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीने सौरऊर्जेच्या दिशेने घेतलेले हे पाऊल म्हणजे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या समाजाची झलक आहे. या प्रकल्पाने नागरी भागीदारी, पर्यावरणीय संवेदनशीलता आणि विज्ञानाधिष्ठित नियोजन यांचे सुंदर मिश्रण साधले आहे.

Follow Us On