Team My Pune City – एका महिलेचा मोबाईल फोन आणि दुचाकी तिच्या मित्राने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना ( Crime News) घडली. ही घटना बुधवार (दि.17 जुलै) रोजी मध्यरात्री पिंपळे सौदागर येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ घडली.
Hinjawadi Crime News : हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
या प्रकरणात पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात ( Crime News) फिर्याद दिली आहे. सचिन भीमराव नागरगोजे (वय 30, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला त्यांच्या रहात्या घरातून कामावर भोसरी येथे दुचाकीवरून जात असताना, त्यांचा जुना मित्र असलेला आरोपी तिथे आला. त्याने “तू आता माझ्याशी का बोलत नाहीस, तू आता दुसऱ्या कोणाशी बोलत आहेस” असे बोलून पीडित महिलेच्या हातातील 15 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून ( Crime News) घेतला.
तसेच, पीडित महिलेला खाली पाडून त्यांच्या ताब्यातील 1 लाख 5 हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा मोटारसायकल (एमएच 26/सीयु 5138) जबरदस्तीने घेऊन स्वराज गार्डन पिंपळे-सौंदागर दिशेकडे पळून गेला. सांगवी पोलीस तपास करत ( Crime News) आहेत.