Team MyPuneCity – नातेवाईकाला सुट्टे पैसे दिले ( Pimple saudagar Crime News) नाही. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.
Crime News : जुन्या वादातून कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत
राजेश गुलाबा काटे (वय ४१, रा. पिंपळे सौदागर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी सनी दिलीप काटे (वय ३८, रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Talegaon Dabhade : उदयसिंह निंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील पवनामाई स्मशनभूमी येथे फिर्यादी राजेश काटे हे झोपले होते. आरोपी काळे याने फिर्यादी यांच्याकडे ५०० रुपये सुट्टे मागितले. मात्र ते फिर्यादी यांनी दिले नाहीत. या वादातून फिर्यादी राजेश काटे यांच्या डोक्यावर झोपेत असताना लाकडी बांबूने ( Pimple saudagar Crime News) वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला.