सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव ( Pimple Gurav)येथे प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादामुळे एका तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तब्बल 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दि. 22 जुलै रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत पिंपळे गुरव येथे घडली आहे.
रामेश्वर रवी घेंगट (वय 26) असे मयत मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात रवी किसन घेंगट यांनी फिर्याद दिली आहे. या वरून पोलिसांनी प्रशांत विनोद खोकर , करण विनोद खोकर, (हे सर्व रा. कोंढवा) सुरेंद्र हरी सारसर, प्रशांत हरी सारसर, महिला आरोपी, सागर हरी सारसर, महिला आरोपी, (हे राहणार पिंपरी) अक्षय राजेश सारसर (सोमवारपेठ) , युवराज सोळंकी (स्वारगेट) या 9 जणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर नवीन दशरथ पिवाल (पिंपळे गुरव) व विनोद पापाजी सोळंकी (लोहगाव) हे पसार झाले आहेत.
PMC : प्रारूप प्रभागरचनेवर पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप
Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविकिसन घेंगट यांचा मुलगा रामेश्वर हा आरोपी सुरेंद्र हरी सारसर ची मुलगी हिच्याशी प्रेमसंबंधात होता. आरोपी नवीन दशरथ पिवाल यांच्या देवकर पार्क, पिंपळे गुरव येथील घरी फिर्यादी, त्यांची पत्नी नीता घेंगट व रामेश्वर यांना चर्चेच्या बहाण्याने बोलावण्यात आले.
यावेळी आरोपी प्रशांत खोकर याने संगनमताने रामेश्वर याला घरात ओढून नेले. दरवाजा बंद करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर सर्वांनी मिळून बेल्ट, लाथाबुक्के व घाव घालून त्याला मारहाण केली. याशिवाय रस्सीने गळा आवळून तसेच जननेंद्रियांवर वार करून गंभीर जखमी केले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या रामेश्वर याचा उपचारा दरम्यान रामेश्वरचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींपैकी 9 जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.