Team My Pune City – पुणे शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना ( PET Scan Center) कर्करोगासारख्या गंभीर आजारांची तपासणी परवडणाऱ्या दरात करता यावी, यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर आधारित ‘पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प’ लवकरच कार्यान्वित होणार असून, डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
सध्या महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ‘पेट स्कॅन’ची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, खासगी तपासणी केंद्रांचे दर सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने अनेक रुग्ण वेळेवर निदान आणि उपचारापासून वंचित राहतात. ही गरज ओळखून महापालिकेने कमी दरात ही सेवा देण्याचा ( PET Scan Center) निर्णय घेतला आहे.
स्वारगेट येथील हिराबाग आरोग्य कोठी शेजारील वसंतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे उपस्थित होते.
या प्रकल्पात पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन यांसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, स्वतःच्या आरोग्य यंत्रणेतून ‘पेट स्कॅन’ व रेडिओ डायग्नोस्टिक प्रयोगशाळा सुरू करणारी पुणे महापालिका देशातील पहिली ( PET Scan Center) महापालिका ठरणार आहे.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वावरे यांनी सांगितले की, या सुविधेमुळे रुग्णांना केंद्र सरकारच्या सीजीएचएस योजनेप्रमाणे सवलतीच्या दरात सेवा मिळणार असून, कर्करोग निदानाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. महापालिका वेळेत काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असून, आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर वेळेवर निदान होणे अत्यावश्यक आहे. महापालिकेचा हा उपक्रम गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ( PET Scan Center) ठरणार आहे.


















