पीसीयूच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप साठी निवड
पीसीयूचे विद्यार्थी मलेशियाला रवाना
Team My pune city – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम ( PCU)करण्याची आणि औद्योगिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
त्या अंतर्गत मलेशिया मधील युनिव्हर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास (यूटीपी) येथे टर्म इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी पीसीयूच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे गौरवास्पद आहे असे पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
Hinjawadi IT Park : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘पीएमआरडीए’ आता ‘सिंगल पॉईंट को-ऑर्डिनेटर’!
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकीच्या बीटेक मधील चार विद्यार्थ्यांची यूटीपी मध्ये ( PCU)निवड झाली. यामध्ये तन्वी काकडे आणि आर्य भोईटे (अंतिम वर्ष), श्रेया कोळी आणि माहि बेदरे (द्वितीय वर्ष) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी कुलगुरू डॉ. कुलकर्णी बोलत होते. यावेळी प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, यूटीपी विद्यापीठ हे दक्षिण आशियात औद्योगिक क्षेत्रातील संबंधांसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित तज्ज्ञांसोबत काम ( PCU)करण्याची, नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये सहभाग घेण्याची आणि प्रगत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी व जागतिक औद्योगिक अनुभव मिळेल. ही निवड पीसीयूच्या उत्कृष्ट शैक्षणिक दर्जाची आणि जागतिक स्तरावर उभ्या राहत असलेल्या विश्वासार्हतेची साक्ष देणारी आहे.
Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू
प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे म्हणाले की, ही उल्लेखनीय कामगिरी पीसीइटी आणि पीसीयू इंटरनॅशनल रिलेशन्स ऑफिस आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने डॉ. करूणा भोसले, डॉ. रोशनी राऊत, प्रा. शितल येवले यांच्या मार्गदर्शनाखाली( PCU)ही निवड झाली. या इंटरनशिप मुळे त्यांना मिळणारे जागतिक अनुभव त्यांचा दृष्टिकोन विशाल होऊन उद्योजकीय नेतृत्व विकसित होईल. पीसीयूमध्ये परिवर्तन घडवणारे अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
या यशस्वी निवडीद्वारे पीसीयू च्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचे ध्येय गाठणे आणि उद्योजक बनवण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन करून शुभेच्छा ( PCU) दिल्या.