situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल

Published On:
PCMC

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांनी अधिक पाणीपट्टी वसूल

Team My Pune City –पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC)मागील वर्षापासून मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महसूल वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरला असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३० रुपयांची पाणीपट्टी महापालिकेने वसूल केली आहे.

शहरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा मिळून सुमारे १ लाख ८० हजार ९०६ नळजोडधारक असून, त्यांच्याकडून विविध माध्यमांतून पाणीपट्टी भरली जात आहे. कर संकलन विभागाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली.

दरम्यान, शहरात अजूनही सुमारे ३२ हजार ४६० नळधारकांकडून पाणीपट्टी थकलेली आहे. “थकबाकीदारांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरावी, अन्यथा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात येईल,” असा इशारा महापालिकेने दिला आहे.

कर संकलन विभागाच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. नागरिकांनी देखील वेळेत पाणीपट्टी भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वर्षनिहाय पहिल्या तिमाहीतील पाणीपट्टी वसुली (रु. कोटीत):

आर्थिक वर्ष
पहिल्या तिमाहित वसूल झालेली पाणीपट्टी
२०१९ – २० 3,17,32,170
२०२०-२१ 10,09,42,560
२०२१-२२ 10,48,49,370
२०२२- २३ 12,58,21,733
२०२३ -२४ 13,95,58,381
२०२४- २५ 15,08,19,651
२०२५- २६ 15,53,11,730

Pimpri: सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित


Pune: पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न


या तिमाहीत जमा झालेल्या रकमेचे माध्यमनिहाय तपशील पुढीलप्रमाणे –

धनादेशाद्वारे: ₹५ कोटी ९० लाख ९८ हजार ५८५

रोख स्वरूपात: ₹३ कोटी ९ लाख ७ हजार ९८६

ऑनलाइन भरणा: ₹६ कोटी ५३ लाख ५ हजार १५९

एकूण: ₹१५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३०


पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी ग्राहकांना लवकरच नादुरुस्त अथवा बंद असलेले पाणीपट्टी मीटर दुरुस्त करण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पाणीपट्टी मीटर नादुरुस्त असल्याने रिडिंग घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बिलात अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पाणीपट्टी मीटर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


मालमत्ता करासोबत पाणीपट्टी वसूल करण्याचा निर्णय महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून योग्य आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. ही फक्त आकडेवारी नाही तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाची पावती आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, अन्यथा थकबाकीदारांवर कटू कारवाई करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल.

— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पाणीपट्टी वसुलीची ही यशस्वी आकडेवारी ही संपूर्ण कर संकलन विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामाचे फलित आहे. आम्ही डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक आहे.

— अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Follow Us On