situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC :९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली!

Published On:
PCMC

Team My Pune city-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे.महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा पाचशे कोटींचा आकडापार करून ऐतिहासिक कामगिरी महापालिकेने केली आहे.

पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील नागरिकांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ताकर वसुली केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे.

पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या. या सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ ते आर्थिक वर्ष २०२५-२६ या पाच आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या कर संकलनाची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीत कर संकलनात विक्रमी वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पहिल्या तिमाहीत १७१.८५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २५३.६५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पहिल्या तिमाहीत ४५४ कोटी रुपये तर २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीत ४४० कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. यंदा मात्र ३० जून २०२५ पर्यंत ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली झाली आहे.

Follow Us On