situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कामकाज शंभर टक्के झाले डिजिटल

Published On:
PCMC

१ एप्रिल २०२५ पासून कागदविरहित प्रशासनाकडे यशस्वी वाटचाल

Team MyPuneCity -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एप्रिल २०२५ पासून कागदविरहित प्रशासनाकडे यशस्वी वाटचाल सुरू केली असून देशातील आधुनिक व स्मार्ट महानगरपालिका होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महानगरपालिकेत दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (Document Management System – DMS), कार्यप्रवाह प्रणाली (Workflow – WF) वापरत १ एप्रिल २०२५ पासून ३१ हजारांहून जास्त कागदपत्र व ३ हजार ७१६ फाईल्सचे कामकाज डिजिटल पद्धतीने पूर्ण केले आहे. याशिवाय, सॅप (SAP), भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि विविध नागरी व प्रशासकीय अ‍ॅप्लिकेशन्सच्या वापरामुळे महानगरपालिकेचे कामकाज अधिकच वेगवान झाले आहे.

महानगरपालिकेच्या सर्व ५४ विभागांमध्ये आता एकही फाईल्स फिजिकल पद्धतीने तयार केली जात नाही. फाईल्स तयार करण्यासाठी डीएमएस आणि वर्क फ्लो प्रणालीचा वापर केला जात आहे. डीएमएस प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायिकरण व शोध घेणे शक्य झाले आहे. तर, वर्क फ्लो प्रणालीमुळे प्रत्येक फाईलचे कामकाज वेळेत पूर्ण होत असून वेळेची बचत होत आहे.

प्रशासनाचे कामकाज पूर्णतः डिजिटल झाल्यामुळे निर्णयप्रक्रिया, पारदर्शकता व जबाबदारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रणालींच्या वापरामुळे स्मार्ट प्रशासन, पारदर्शक कामकाज या दिशेने महानगरपालिकेची यशस्वी वाटचाल सुरू असून महानगरपालिकेच्या सेवासुविधा नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यास देखील मदत होऊ लागली आहे.

वेतन आणि बिलासाठी सॅप प्रणालीचा वापर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन व ठेकेदारांचे बिले काढण्यासाठी आता सॅप (SAP) प्रणालीचा वापर केला जात आहे. मार्च व एप्रिलमध्ये ६ हजार ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांचे बिले सॅप प्रणालीद्वारे काढण्यात आली आहेत. याशिवाय, महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विभागांनी सॅप प्रणालीवर १७६ अंदाजपत्रके तयार केली असून, ही जीआयएस (GIS) डेटाबेसवर नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे त्यांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग शक्य झाले आहे. विवाह नोंदणी, क्रीडा मैदाने व सभागृह बुकिंग, झोपडपट्टी बिलिंग यांसारख्या नागरी सेवा देखील डिजिटल झाल्या आहेत.

ई-गव्हर्नन्समध्ये होतेय ओळख निर्माण

३८० हून अधिक जीआयएस लेअर, भूआकृती विश्लेषणासाठी डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, ६ लाखांहून अधिक जिओटॅग केलेल्या मालमत्तांमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशभरातील ई-गव्हर्नन्समध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. हाय रिझोल्यूशन सॅटेलाइट इमेज व सर्व्हेच्या आधारे ही प्रणाली विकसित असून महानगरपालिकेचे सर्व विभाग एकाच जीआयएस प्लॅटफॉर्मवर जोडले गेले आहेत. ही प्रणाली प्रधानमंत्री गतिशक्ती पोर्टलशी देखील जोडण्यात आलेली असून विविध विभागांमधील समन्वय आणि सर्वांगिण पायाभूत विकास नियोजन करण्यासाठी ती उपयुक्त ठरत आहे. याशिवाय जमीन नोंदी, सेवासुविधा, मालमत्तेची माहिती आदी नागरिकांना ऑनलाइन सहज उपलब्ध होत आहे. या माहितीसाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नसल्याने वेळ, खर्चाची बचत होत असून कागदोपत्री कामकाज देखील कमी झाले आहे.

…….

डिजिटल कामकाजाचा झालेला फायदा

-५४ विभागांमध्ये १०० टक्के कागदविरहित कामकाज

-जीआयएस आधारित ईआरपी, सिंगल साईन ऑन (SSO) प्रणाली आणि एकत्रित डॅशबोर्ड यामुळे प्रत्येक फाईलची माहिती मिळविणे शक्य झाले आहे.

-ई-ऑफिस प्रणालीद्वारे ८ हजार ७४२ ई-मेल्स पाठवण्यात आले आहेत.

-१ हजार ७०९ डिजिटल सिग्नेचर की तयार करण्यात आल्या आहेत.
…………

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागात आता फिजिकल पद्धतीने फाईल एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठवण्याची गरज राहिली नाही. महानगरपालिकेचे संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरुपात करण्यात आले असून यामुळे प्रशासनातील कामकाजाची गती, पारदर्शकता वाढली आहे. केवळ डिजिटल स्वरुपातील हा बदल नसून तो कार्यक्षमतेचा व विश्वासार्हतेचा प्रतीक आहे. या यंत्रणेमध्ये वापरकर्त्यांच्या अभिप्रायावरून सुधारणा देखील केल्या जात आहेत.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ………..

Follow Us On