समाज विकास विभाग तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलांना देतोय अधिक सुलभ व जलद मदतीचा हात
Team My pune city – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ( PCMC) समाज विकास विभागाच्या शहरातील महिला बचत गटांच्या निर्मितीसाठी महिलांना घरबसल्या ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या प्रणालीचे उद्घाटन समाज विकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या अंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करणाऱ्या महिला बचत( PCMC) गटांना प्रातिनिधिक स्वरुपात उप आयुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी रहाटणी येथील अंकुर महिला बचत गटातील अध्यक्ष विद्या संतोष निकम, उपाध्यक्ष कविता निलेश माने, सचिव भावना सपरिया तसेच समृद्धी निकम, मनीषा घुले, राणी जाधव, वंदना जाधव, स्मिता जानराव, अस्मिता सपाप्रिया आणि ध्वनी सपाप्रिया यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना आर्थिक निर्भर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत महिला बचत गट निर्मितीला चालना देऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ( PCMC)
पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना आर्थिक निर्भर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत महिला बचत गट निर्मितीला चालना देऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या अंतर्गत आता बचत गटांना ऑनलाईन प्रमाणपत्र प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीतील १० पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन बचत गटाची निर्मिती करू शकतात. अशा गटांमार्फत दर महिन्याला ठराविक रक्कम बचत करून महिलांना केवळ आर्थिक बळच नव्हे तर आत्मनिर्भरतेकडेही वाटचाल करता येते.
Kundamala News : कुंडमळा येथील तुटलेल्या पुलाचा सांगाडा नदीत गेला वाहून
यापूर्वी बचत गट नोंदणीची प्रक्रिया ऑफलाईन ( PCMC)पद्धतीने केली जात होती. मात्र, आता ऑनलाईन प्रमाणपत्र प्रणाली विकसित करण्यात आल्यामुळे महिला घरबसल्या सोयीस्करपणे अर्ज करून प्रमाणपत्र मिळवू शकतील. महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन महिला बचत गटांनी अर्ज करून सहजपणे प्रमाणपत्र मिळवता येईल.
——-
पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना ऑनलाईन ( PCMC) प्रणालीद्वारे महिलांना सुलभपणे आणि जलद गतीने प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण महिलांसाठी प्रणाली विकसित केली असून महिलांनी याचा लाभ घ्यावा.
- ममता शिंदे, उप आयुक्त समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.