situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण दिनापासून वर्षभरात करणार १ लाखांहून अधिक देशी वृक्षांची लागवड….

Published On:
PCMC

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन…

Team MyPuneCity – शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच निरोगी वातावरण मिळण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागामार्फत “जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या वर्षभरात सुमारे १.५ लाख देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे तसेच ५ ते ११ जून २०२५ या कालावधीत वृक्षारोपण सप्ताहाचे ( PCMC) आयोजन देखील करण्यात आले आहे.

Manjari  Crime News : मांजरी परिसरात बंदुकीतून गोळी झाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी जेरबंद

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये वृक्षसंवर्धनाचे कार्य सातत्याने करण्यात येते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आयोजित या वृक्षारोपण सप्ताहात पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघटना, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी व शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले ( PCMC) आहे.

सप्ताहाअंतर्गत राबविण्यात येणार विविध उपक्रम:

१. देशी वृक्षांची लागवड व जनजागृती:
शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यामाध्यमातून वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत व्यापक जनजागृती करण्यात येईल.

२. ज्येष्ठ नागरिक, वृक्षतज्ञ व सामाजिक संस्थांचे संवाद सत्र:
पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते, वृक्षतज्ञ व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विशेष चर्चासत्रे आयोजित केली ( PCMC) जातील.

३. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग:
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे भान निर्माण व्हावे म्हणून विविध उद्यानांमध्ये सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, मार्गदर्शन सत्रे आणि “माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत उपक्रम राबवले जातील.

४. सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यक्रम:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्थानिक पातळीवर वृक्षारोपण आणि पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात ( PCMC) येणार आहे.

५. संरक्षण खात्याच्या जागांवर वृक्षारोपण:
मनपा हद्दीतील संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या मोकळ्या जागांवर देखील वृक्षारोपण करण्यात येईल.


वृक्ष हे फक्त सौंदर्यासाठी नसून ते प्राणवायूचे स्रोत, छाया व जैवविविधतेचे रक्षण करणारे घटक आहेत, त्यामुळे पर्यावरण पूरक जीवनशैलीसाठी नागरिकांनी दरवर्षी किमान एक तरी देशी वृक्ष लावून त्याचे पालनपोषण करावे. हा वृक्षारोपण सप्ताह म्हणजे केवळ उपक्रम नाही तर आपल्या भविष्यासाठी केलेला एक संकल्प आहे. या उपक्रमात महिलांचे, शालेय विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर योगदान अपेक्षित ( PCMC) आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Follow Us On