situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात सर्वप्रथम स्वच्छतेमध्ये दमदार वाटचाल

Published On:
PCMC

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात सातवा क्रमांक तर राज्यात प्रथम क्रमांक ७ स्टार गार्बेज फ्री सिटी आणि वॉटर प्लसचे पुन्हा एकदा मानांकन प्राप्त

Team My pune city – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ( PCMC ) स्वच्छतेच्या क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये, पिंपरी-चिंचवड शहराने देशात ७ वा क्रमांक तर राज्यात सर्वप्रथम क्रमांकाबरोबरच ७ स्टार गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस असे पुन्हा एकदा मानांकन मिळवून दर्जेदार कामगिरी केली आहे.

PCMC : तीन लांखाहून अधिक नागरिकांनी भरला ऑनलाइन कर


गेल्यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहराला देशात १३ वा तर राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता.यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ( PCMC ) दमदार कामगिरी केली आहे.

  • देशपातळीवरील मिळाली मान्यता: स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४ च्या या स्पर्धेमध्ये ५००० हून अधिक शहरांनी भाग घेतला, त्यात पिंपरी-चिंचवड शहराने ( PCMC ) आपली सातव्या क्रमांकावर घोडदौड कायम ठेवत उत्कृष्ट कामगिरी बजावली.

  • ७ स्टार मानांकन – कचरा मुक्त शहर महानगरपालिकेच्या ( PCMC ) विविध उपाययोजनांमुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याचे कार्य नियमितपणे केले जात आहे. प्रत्येक प्रभागात घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्रोताजवळ प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर केला जात आहे. यामुळे शहराने ७ स्टार कचरा मुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त केले आहे.
  • वॉटर प्लसचे देखील मानांकन स्वच्छ जलनिस्सारणाची ओळख: पिंपरी-चिंचवड शहरात ( PCMC ) मलनिस्सारणाची कार्यक्षम व्यवस्था, सीवेज ट्रीटमेंट प्लांट (STP), नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि पुर्नवापर यामध्ये भरीव कामगिरी करण्यात आली आहे. मलमूत्र मुक्त परिसर, नद्या-नाले स्वच्छ ठेवणे आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे या निकषांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने १००% कामगिरी बजावली आणि वॉटर प्लस प्रमाणपत्र मिळवले. नागरिकांचा देखील सक्रीय सहभाग: स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी केवळ महापालिकेचे नव्हे, तर शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा व उद्योगांचे मोठे योगदान लाभले. नागरिकांनी नियमित कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.
    ……

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे ‘स्पायडर वॉक’ आणि ‘मॉथ वीक’ उपक्रम , येत्या रविवारी जुलै रोजी निसर्गप्रेमींना खास संधी

पिंपरी-चिंचवड शहरातील ( PCMC ) स्वच्छतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे, सफाई कर्मचारी, अधिकारीवर्ग, आणि स्वयंसेवी संस्थांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान आपणा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. येत्या काळात आपली जबाबदारी आणखी वाढली असून,त्यादृष्टीने आणखी अनेक शाश्वत उपक्रम राबविले जातील.

-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
……..


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ( PCMC ) स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून, आता पुढील उद्दिष्ट म्हणजे शाश्वत स्वच्छता, घनकचरा शून्य धोरण, जलपुनर्वापर आणि पर्यावरणपूरक शहर यासाठी प्रयत्न करणार आहोत

-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

……


पिंपरी चिंचवड महापालिकेला ( PCMC ) स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून, आरोग्य विभाग तसेच शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असून येत्या काळात आणखी जोमाने पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी पुढच्या वेळी देशात सर्वप्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

-सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Follow Us On