situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी महापालिकेची धडक कारवाई

Published On:
pcmc

आरोग्य विभागाकडून नागरिकांचे विविध माध्यमातून केले जात आहे प्रबोधन

Team My pune city – डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( PCMC) आरोग्य विभागाच्या वतीने डास निर्मूलनाच्या उपाययोजना अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे.

औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यावर भर देण्यात येत आहे.

Engineer’s suicide : हिंजवडीतील कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

महानगरपालिकेच्या ( PCMC) आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत समन्वय साधून करण्यात आली कारवाई

  • घरांची तपासणी : एकूण ६ लाख १४ हजार ८५५ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १० हजार ६०७ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले
  • कंटेनर तपासणी : ३२ लाख ५४ हजार ७३८ कंटेनरपैकी ११ हजार ५१२ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.
  • भंगार दुकाने – १३८५ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.
  • बांधकाम स्थळे – १७३४ बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
  • नोटीस व दंड – ३ हजार ६१२ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून ७३९ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करत २६ लाख २७ हजार इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. डासांपासून असा करा बचाव :
  • आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा.
  • साचलेले पाणी काढून टाका.
  • फुलदाणी, टाकी, टायर, प्लास्टिक वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका.

Lonavala Accident : पीएमपीएमएल आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

डेंग्यू प्रतिबंधासाठी विविध जनजागृती उपक्रम: ( PCMC)

नियमित औषध फवारणी

घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण

शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण

प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा
……..


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून डेंग्यू मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी, तपासण्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहकार्य करून आपल्या परिसरातील स्वच्छता राखून या व्यापक मोहिमेस सहकार्य करावे

— शेखर सिंह
आयुक्त तथा प्रशासक,पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( PCMC)
……..


डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व स्तरांतून उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनी देखील स्वच्छता राखावी तसेच आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा तसेच डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसल्यास नजीकच्या सरकारी रुग्णालयशी त्वरित संपर्क साधावा.

— विजयकुमार खोराटे
अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( PCMC)
………..

डेंग्यू मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून औषध फवारणी बरोबरच जनजागृती देखील करण्यात येत असून, नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे

-सचिन पवार,उप आयुक्त, आरोग्य विभाग,पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( PCMC)

Follow Us On