पिंपरी-चिंचवडकरांचा ऑनलाइन मालमत्ता कर भरणा मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Team My pune city – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ( PCMC) मालमत्ता कर वसुली मोहिमे अंतर्गत शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरताना दिसत आहेत. १ एप्रिल ते १६ जुलै या कालावधीत तब्बल ४ लाख २८ हजार मालमत्ताधारकांनी मिळून एकूण ५४४ कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे.
Navnagar Pradhikaran : नवनगर प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ साठी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय!
महापालिकेच्या वतीने १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलतीची सुविधा देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ ३ लाख २३ हजार २३९ मालमत्ताधारकांनी घेतला. तसेच ज्या मालमत्ताधारकांना यावेळी सवलत घेता आली नाही, त्यांच्या सोयीसाठी महापालिकेने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलत जाहीर केली आहे. नागरिक विविध पर्यायांचा वापर करून कर भरणा करत ( PCMC) आहेत.
ऑनलाइन प्रणाली, कॅश काऊंटर, ईडीसी, आरटीजीएस, डिमांड ड्राफ्ट, BBPS अशा माध्यमातून कर भरणा सुरू आहे.
यामध्ये – ऑनलाइन : ३९४ कोटी ३३ लाख
रोख रक्कम : ३२ कोटी ७० लाख ८० हजार धनादेश : २५ कोटी ६१ लाख २३ हजार
ईडीसी : ६ लाख ६ हजार
आरटीजीएस : २४ कोटी ६२ लाख ८५ हजार डीडी : ७४ लाख ३२ हजार
BBPS : १७ लाख ८३ हजार मालमत्ता कर
संकलनासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून, नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. चौकट- धनादेश अनादर झाल्यास कारवाई दरम्यान, अनेक मालमत्ताधारकांनी धनादेशाद्वारे कर भरणा केला असला तरी काही धनादेश वटले नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून संबंधित मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करणे, नळजोड तोडणे आदी कठोर पावले उचलली ( PCMC) जात आहेत.
मालमत्ता कर वसुलीसाठी नागरिकांशी थेट संवाद पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, नागरिकांना कर सवलतीची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधला जात आहे.१८ विभागीय कार्यालयांमार्फत लिपिक, गट लिपिक, सहायक मंडलाधिकारी आणि इतर एकूण २० कर्मचाऱ्यांची टीम टेलिकॉलिंगच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधत आहे. या संवादातून नागरिकांना मालमत्ता कर सवलतीची माहिती दिली जात असून, वेळेत कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच जे मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत किंवा चालू वर्षात अद्याप कर भरलेला नाही, त्यांना टेलिकॉलिंग, मेसेज, VMD तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या ( PCMC) या विशेष मोहिमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.
ऑनलाइन कर भरणा मोहिमेला नागरिकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, तो खरोखरच प्रशंसनीय आहे. आम्ही नागरिकांना अधिकाधिक सवलतीसह ऑनलाइन कर भरण्यासाठी प्रोत्साहन देत राहू. तीन लाख पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे हे अत्यंत समाधानकारक आहे. महापालिकेच्या ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सुविधा मिळते. यापुढेही आम्ही अशा नाविन्यपूर्ण उपक्रम ( PCMC) राबवत राहू.
– प्रदीप जांभळे पाटील – अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
धनादेश अनादर झाल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाआहे.थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्ती,नळकनेक्शन खंडित करणे अशी कटू कारवाई करत आहेत. अशी कटू कारवाई टाळून नागरिकांनी वेळेत कर ( PCMC) भरावा.
– अविनाश शिंदे – सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.