situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोनोग्राफी मशीन खरेदीत अनियमितता? चौकशीची मागणी

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नुकत्याच खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय शहरातील सर्वसामान्य नागरिक राहुल कोल्हटकर यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरातील सहा रुग्णालयांसाठी सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानताना, राहुल कोल्हटकर यांनी खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दैनिक सकाळमध्ये १६ एप्रिल रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते.

Chikhali Crime News : चिखलीत शस्‍त्राने वार करीत एकाचा खून

निवेदनात नमूद केल्यानुसार, महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव, आकुर्डी, सांगवी, यमुनानगर या रुग्णालयांसाठी आणि वायसीएम रुग्णालयातील भूलशास्त्र विभागासाठी कलर डॉप्लर अल्ट्रासाऊंड मशीन खरेदीसाठी ई-निविदा (क्रमांक ३६/२०२४-२५) जारी केली होती. या निविदेच्या पूर्व-बोली बैठकीत (प्री-बिड मीटिंग) सहभागी झालेल्या ठेकेदार किंवा कंपन्यांनी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, खरेदीसाठी आयुक्तांच्या मान्यतेने एक प्री-बिड अमेडमेंट अहवाल तयार करण्यात आला असावा. मात्र, प्रत्यक्षात पुरवठा करण्यात आलेल्या मशीन याच अहवालानुसार आहेत का, याची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे का, असा सवाल कोल्हटकर यांनी उपस्थित केला आहे.

Talegaon Dabhade : उदयसिंह निंबाळकर यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती

या साहित्याची खरेदी प्री-बिड अमेडमेंटनुसार झाली नसल्याची शक्यता वर्तवत, कोल्हटकर यांनी ई-निविदा ३६/२०२४-२५ अंतर्गत खरेदी केलेल्या सोनोग्राफी मशीनची तपासणी करण्याची आणि निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी १७ एप्रिल रोजी डॉ. लक्ष्मण गोफणे (वैद्यकीय अधिकारी) आणि निलेश भदाने (उपायुक्त, भांडार विभाग) यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती. मात्र, ७ मे २०२५ पर्यंत या निवेदनावर भांडार विभाग किंवा वैद्यकीय विभागाने कोणताही अहवाल सादर न केल्याने खरेदीत अनियमितता झाल्याचा संशय अधिक दृढ होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे, या सोनोग्राफी मशीन खरेदीमध्ये अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत, येत्या १० दिवसात तज्ञ समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे केली आहे.

निवेदनासोबत त्यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनाची प्रत आणि वृत्तपत्रातील संबंधित बातमीची प्रतही जोडली आहे. आता या गंभीर आरोपांवर महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.

Follow Us On