situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनद्वारे महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर

Published On:
PCMC

पिंपरी चिंचवड शहरातील ७० हून अधिक महिलांनी घेतला लाभ

Team My pune city – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ( PCMC) वैद्यकीय विभाग व इंडियन मेडिकल असोसिएशन (पीसीबी शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृह, सांगवी रुग्णालय येथे महिलांसाठी विशेष स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व इंडियन मेडिकल असोसिएशन (पीसीबी शाखा) चे डॉ. दिलीप कामत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

Talegaon Dabhade : महिलांना स्वावलंबनाचे बळ ; तळेगाव दाभाडे येथे ३० दिवसीय वस्त्रचित्र कला प्रशिक्षण संपन्न

या शिबिरात अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी व्हॅनचा वापर करण्यात आला. या व्हॅनमध्ये उच्च रिझोल्यूशन एक्स-रे तंत्रज्ञान, संगणकीय प्रतिमा प्रक्रिया प्रणाली, आणि तज्ज्ञ तांत्रिक कर्मचारी उपलब्ध असतात. यामुळे स्तनातील गाठ, ऊतकांतील सूक्ष्म बदल किंवा कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे अगदी कमी डोसच्या किरणोत्सर्गाने अचूकपणे शोधता येतात. डिजिटल पद्धतीमुळे तपासणीचे परिणाम त्वरित मिळतात व त्यांचे संग्रहण पुढील उपचारासाठी सुलभ ( PCMC)होते.

PMC : पुणे महापालिकेचा गळती शोध पथक उपक्रम; अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी

या उपक्रमाद्वारे महिलांना मोफत तपासणीची सुविधा मिळाली. शिबिरात ७० हून अधिक महिलांनी तपासणी करून घेतली व स्तन कर्करोग प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन मिळविले.

या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, डॉ. ललित धोका, डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ. प्रकाश रोकडे तसेच डॉ. रितू लोखंडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित ( PCMC)केले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. करुणा साबळे, सांगवी रुग्णालयातील कर्मचारीवृंद तसेच आशा स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

येत्या काळात अशा शिबिरांचे आयोजन महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये करण्याचे योजिले असून, नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.

“स्तनाचा कर्करोग हा वाढत्या प्रमाणात आढळत असला तरी वेळेत निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. या अनुषंगाने डिजिटल मॅमोग्राफी व्हॅन सारखी ( PCMC) आधुनिक साधने ग्रामीण व शहरी भागातील जास्तीत-जास्त महिलांपर्यंत पोहोचावी हा आमचा मानस आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून तो प्रभावीपणे पूर्ण होत असल्याचे दिसत आहे.”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.

Follow Us On